उत्तर प्रदेशमध्ये भाजपची सत्ता आल्यापासून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांचे निर्णय आणि अन्य गोष्टींमुळे सातत्याने चर्चेत राहिले आहेत. आता यामध्ये एका वादग्रस्त गोष्टीची भर पडली आहे. योगी आदित्यनाथ यांच्या कुशीनगर भेटीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक अधिकाऱ्यांकडून एक अजब फर्मान काढण्यात आले होते.  योगी आदित्यनाथ यांना भेटायला येताना लोकांच्या अंगाला चांगला वास आला पाहिजे. त्यामुळे लोकांनी योगी आदित्यनाथ यांना भेटण्यापूर्वी साबण, शॅम्पू लावून स्वच्छ आंघोळ करून या. पावडर लावा आणि सेंटही मारा, असे फर्मान काढण्यात आले होते. त्यासाठी योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकर्त्यांकडून गावकऱ्यांना साबण, शॅम्पू आणि सेंटचे वाटपही करण्यात आल्याचे समजते.

उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यातील मैनपूर कोट गावात २५ मे रोजी योगींचा दौरा आयोजित करण्यात आला होता. येथील मुसहर परिसरात आदित्यनाथांच्या हस्ते इन्सेफेलायटीस लसीकरण मोहिमेला सुरूवात होणार होती. त्यांच्या दौऱ्यापूर्वी अधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटण्यापूर्वी स्वच्छ आंघोळ करून सेंट मारून या, असे सक्त आदेशच दिले.

Story img Loader