काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भगवान हनुमान दलित असल्याचं विधान केलं होतं, त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर यांनी दलित बांधवांनी देशातील हनुमान मंदिरांचा ताबा घ्यावा असे म्हटले आहे.
राजस्थानच्या अलवार येथे एका प्रचारसभेत बोलताना योगी आदित्यनाथ यांनी, ‘हनुमान हे वनवासी होते. ते उपेक्षित, दलित होते. उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिमधील संपूर्ण हिंदुस्थानी समाजाला संघटित करण्याचे कार्य त्यांनी केले’, असे वक्तव्य केले होते. थ्यांच्या या विधानानंतर वादाला सुरूवात झाली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना रविवारी चंद्रशेखर यांनी देशातील सर्व दलित बांधवांनी देशातील हनुमान मंदिरांचा ताबा घ्यावा आणि आपल्या समाजाचे बांधव पुजारी म्हणून नियुक्त करावेत असे आवाहन केले.
यापूर्वी अनुसूचित जमाती (एसटी) आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साय यांनी उडी घेत हनुमान दलित नव्हे तर आदिवासी होते, असा दावा केला आहे.