नवी दिल्ली : महिनाभरापूर्वी करोनाचा संसर्ग झालेले  नृत्य इतिहासकार व समीक्षक सुनील कोठारी यांचे रविवारी सकाळी दिल्ली येथील रुग्णालयात निधन झाले, त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ते ८७ वर्षांचे होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

त्यांना पद्मश्री किताबाने गौरविण्यात आले होते. त्यांचा जन्म २० डिसेंबर १९३३ रोजी मुंबईत झाला. ते चार्टर्ड अकाउंटंट होते. नंतर ते भारतीय नृत्य प्रकारांच्या अभ्यासाकडे वळले. त्यांनी वीस पुस्तके लिहिली असून त्यात भारतीय नृत्य प्रकारांवर नवा प्रकाश  टाकला आहे. त्यात सत्रिया डान्सेस ऑफ आसाम, न्यू डायरेकशन्स इन इंडियन डान्स ही   पुस्तके प्रसिद्ध आहेत. भरतनाटय़म, ओडिशी, छाहू, कथ्थक, कुचीपुडी या नृत्य प्रकारांवर त्यांनी लेखन केले. रबींद्र  भारती विद्यापीठाच्या उदय शंकर अध्यासनाचे ते प्रमुख होते. त्यांनी न्यूयॉर्क विद्यापीठाच्या नृत्य विभागात अध्यापन केले. ते फुलब्राइट प्राध्यापकही होते.

३१ डिसेंबपर्यंत सरकारी घर खाली करण्याच्या नोटिसा ज्यांना देण्यात आल्या होत्या, त्यात त्यांचा समावेश होता. त्यावर त्यांनी आपल्याला अवमानकारक वागणूक देण्यात येत असल्याचे म्हटले होते.