आंध्र प्रदेशचे विभाजन करून स्वतंत्र तेलंगणाची निर्मिती केल्यास देशाच्या अन्य राज्यांमध्ये विभाजनाची आग्रही मागणी करणाऱ्यांना प्रोत्साहनच मिळेल, असे मत जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केले आहे.
स्वतंत्र तेलंगणा राज्याची निर्मिती करावयाची असल्यास काही हरकत नाही. मात्र विविध ठिकाणी टप्प्याटप्प्यांमध्ये तसे केल्यास त्यामुळे अनेकांना प्रोत्साहनच मिळेल. आंदोलन केल्याने स्वंतत्र राज्याच्या निर्मितीला अनुकूलता दर्शविणे ही धोकादायक बाब आहे, असेही अब्दुल्ला म्हणाले. आंदोलन केल्यास वेगळ्या राज्याची निर्मिती होते, असा संदेश या कृतीतून जातो. बुंदेलखंड, महाराष्ट्र, गोरखा लॅण्ड किंवा जम्मू-काश्मीर असेल हा प्रकार धोकादायक आहे. त्यामुळे नव्या राज्याच्या निर्मितीचा निर्णय राज्यांच्या पुर्नसघटन आयोगांवर सोपवावा, असे मतही अब्दुल्ला यांनी व्यक्त केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा