Darbar Hall Renamed in Rashtrapati Bhawan : देशात काही शहरांची, रस्त्यांची नावं बदलण्याचा मुद्दा बऱ्याचदा चर्चेत येतो. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही होताना दिसतात. अशा रस्ते किंवा शहरांना कुठली नावं द्यायची, त्यांचा संदर्भ कुणाशी आहे अशा अनेक बाबतीत टीका-टिप्पणीही केली जाते. मात्र, आता थेट राष्ट्रपती भवनातील काही अत्यंत महत्त्वाच्या हॉलपैकी दोन हॉलची नावं बदलण्यात आली आहेत. खुद्द राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीच यासंदर्भातली घोषणा केली आहे. इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार दरबार हॉल आणि अशोक हॉल अशी या दोन हॉलची आधीची नावं होती.

राष्ट्रपती भवनाकडून निवेदन जारी

दरबार हॉल आणि अशोक हॉल हे राष्ट्रपती भवनातल्या काही महत्त्वाच्या हॉलपैकी दोन हॉल आहेत. यातील दरबार हॉलमध्ये राष्ट्रीय पुरस्कार प्रदानासारखे अनेक महत्त्वाचे सोहळे पार पडतात. तर दुसरीकडे अशोक हॉलमध्ये विशेष कार्यक्रम घेतले जातात. या दोन्ही हॉलची नावं बदलण्यासंदर्भात राष्ट्रपती भवनाकडून निवेदन जारी करण्यात आलं असून त्यात यासंदर्भात प्रयत्न केले जात होते, असं नमूद करण्यात आलं आहे. (Ashok Hall in Rashtrapati Bhawan)

Anganewadi Bharadi Devi Jatra celebrations with traditional rituals and vibrant festivities.
Anganewadi Jatra : देवीने कौल दिला अन् ठरली आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख, ‘या’ दिवशी सुरू होणार उत्सव
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Panvel Municipal Commissioner decision to build infectious disease hospital in Kalamboli
कळंबोलीत साथरोग रुग्णालय; पनवेल महापालिका आयुक्तांचा निर्णय, २७ कोटींचा खर्च अपेक्षित
Bal Shivaji Park, Marathi Bhavan, Ulhasnagar,
उल्हासनगरात बाल शिवाजी उद्यान, महिला, मराठी भवन; उल्हासनगरच्या बोट क्लबचेही सुशोभीकरण होणार, निधी मंजूर
provide government guest houses for interfaith couples says bombay high court
आंतरधर्मीय जोडप्यांसाठी अतिथीगृहे उपलब्ध करून द्या; उच्च न्यायालयाची सूचना
celebrations at durgadi fort in kalyan
कल्याणमधील दुर्गाडी किल्ला येथे जल्लोष
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
देवेंद्र फडणवीस येती घरा…तोची …
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका

“राष्ट्रपती भवनातील वातावरण हे भारतीय संस्कृती, मूल्ये आणि तत्वांचं प्रतिबिंब असावं, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत”, असं राष्ट्रपती भवनाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

काय आहेत बदललेली नावं?

राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचं नामकरण आता ‘गणतंत्र मंडप’ असं करण्यात आलं आहे. तर अशोक हॉल इथून पुढे ‘अशोक मंडप’ म्हणून ओळखला जाणार आहे. ‘दरबार हा शब्द प्रामुख्याने भारतीय शासक व ब्रिटिशांच्या न्यायनिवाड्याच्या जागेशी संबंधित आहे. पण भारत प्रजासत्ताक राष्ट्र अर्थात गणतंत्र झाल्यापासून हा शब्द गैरलागू झाला आहे. गणतंत्र पद्धती ही भारतीय समाजव्यवस्थेमध्ये अगदी प्राचीन काळापासून रुजलेली आहे’, असं या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.

अशोक हॉल हा मुळात बॉलरूम म्हणून वापरला जायचा. अशोक हा शब्द सर्व प्रकारच्या वेदनांपासून मुक्त अशा अर्थाने वापरला जातो. त्याशिवाय, सम्राट अशोकाच्या नावानेही हे नाव जोडलं जातं. त्याशिवाय, भारतीय रूढी-परंपरांमध्ये महत्त्वाचं स्थान असणाऱ्या अशोक वृक्षाशीही हे नाव जोडलं जातं. ‘अशोक हॉलचं नामकरण अशोक मंडप असं केल्यामुळे भाषेची एकता साधली जाते, नावांच्या इंग्रजीकरणापासून दूर राहता येतं आणि अशोक शब्दाशी निगडीत मुलभूत तत्वही त्यातून प्रतिबिंबित होतात’, असं राष्ट्रपती भवनाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे. (Rashtrapati Bhawan Ballroom)

शपथविधीदरम्यान राष्ट्रपती भवनात दिसलेला तो प्राणी कोणता? दिल्ली पोलिसांनी अखेर केलं स्पष्ट!

मुघल गार्डनचंही नाव बदललं!

गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात राष्ट्रपती भवनातील प्रसिद्ध मुघल गार्डनचं नाव बदलून अमृत उद्यान करण्यात आलं होतं. “स्वातंत्र्यप्राप्तीला ७५ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राष्ट्रपतींनी भवनातील सर्व उद्यानांना एकच सामायिक नाव म्हणून अमृत उद्यान हे नाव दिलं आहे”, अशी माहिती त्यावेळी राष्ट्रपतींच्या माध्यम उपसचिव नाविका गुप्ता यांनी दिली होती.

Story img Loader