अभिनेते मकरंद अनासपुरे यांचा ‘जाऊ तिथे खाऊ’ हा चित्रपट अनेकांना माहीत असेल. या चित्रपटात मकरंद अनासपुरे त्यांची विहीर हरविल्याची तक्रार पोलिसांत दाखल करतात आणि प्रकरण न्यायालयापर्यंत जाते. गावातील ग्रामपंचायतीपासून ते वरपर्यंत सर्व यंत्रणा भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे, हे या चित्रपटातून दाखविण्यात आले होते. हसत-हसत भ्रष्टाचारावर भाष्य करणारा हा चित्रपट त्या वेळी चांगलाच गाजला. मात्र त्यातील विहीर चोरी होण्याची किंवा त्यासदृश्य घटना आजही देशात कुठे ना कुठे घडत असतात. बिहारच्या दरभंगामध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. इथे विहीर नाही तर अख्खा तलावच चोरी झाला. दरभंगा विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत सदर घटना घडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तलाव कसा चोरी झाला?

भूमाफियांनी दरभंगा जिल्ह्यातील एका तलावात रातोरात भराव टाकून त्यावर एक झोपडीही बनविली. स्थानिकांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस अधिकारी अमित कुमार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. मात्रतोपर्यंत भूमाफियांनी तिथून पळ काढला होता. स्वतः अमित कुमार यांनी स्थानिकांशी बातचीत करून माहिती मिळवली. त्यानंतर कळले की, सदर तलाव सरकारी होता. त्याची वेळोवेळी देखभालही राखली जात होती. मात्र दरभंगामध्ये जमिनीचे भाव वाढत चालल्यामुळे भूमाफियाचा डोळा या तलावाच्या जमिनीवर होता.

रात्रीच्या अंधारात भराव टाकला

हा तलाव एका रात्रीत बुजविण्यात आलेला नाही. भूमाफियांनी हळूहळू तलावात भराव टाकायला सुरूवात केली होती. त्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली होती. पोलिसांनी तेव्हा घटनास्थळावर धाड टाकून भराव टाकण्याचे काम बंद पाडले आणि भूमाफियांची उपकरणे जप्त केली होती. मात्र कालांतराने भूमाफियांनी पोलिसांशी संधान बांधले आणि आठवड्याच्या आत भूमाफियांनी रोज रात्री अंधारात काम करून तलाव पूर्णपणे बुजवून टाकला आणि त्याठिकाणी सपाट मैदान तयार केले.