हवाई बेटांवर असलेल्या दुर्बिणीच्या माध्यमातून चंद्राच्या अंधारात असलेल्या बाजूची काही निरीक्षणे घेण्यात आली असून चंद्राचा तो भाग पिरोजा (निळा अधिक हिरवा मिळून बनणारा रंग) रंगाचा आहे. हवाई बेटांवर मौना लोआ वेधशाळा असून तेथून चंद्राची जी निरीक्षणे घेतली गेली त्यावरून चंद्राच्या त्या अंधारात असलेल्या बाजूवर पृथ्वीवरून परावर्तित झालेले निळे किरण पडत असतात. चंद्राच्या अंधाऱ्या बाजूचा रंग नेमका कसा आहे याचे प्रथमच विश्वासार्ह संशोधन झाले आहे, असे कोपनहेगन येथील डॅनिश हवामानशास्त्र संस्थेचे पीटर थेजिल यांनी सांगितले.
संशोधकांनी एक दुर्बीण व संवेदनशील कॅमेरा या वेधशाळेत ठेवला असून त्याच्या आधारे चंद्राच्या त्या बाजूची मापने गेली दोन वर्षे घेतली जात होती. चंद्राच्या अंधारातील बाजूचे स्वरूप प्रकाशातील बाजूसारखे नाही, प्रकाशित बाजू ही सूर्यप्रकाशामुळे प्रकाशित दिसते कारण चंद्र हा परप्रकाशी आहे. अंधारातील बाजू थेट सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात येत नाही, पण पृथ्वीवर पडलेला प्रकाश परावर्तित होऊन चंद्राच्या अप्रकाशित बाजूवर पडतो व परत आपल्याकडे येतो त्यामुळे चंद्राच्या अप्रकाशित बाजूची माहिती मिळू शकली. पृथ्वीची अवकाशातून घेतलेली छायाचित्रे पाहिली तर पृथ्वी निळी दिसून येते पण जेव्हा निळा प्रकाश चंद्रावर आदळतो व तो पिरोजा होऊन परत येतो असे थेजिल यांनी म्हटले आहे. चंद्रावरील अवकाशवीरांना पृथ्वी निळ्या गोटीसारखी दिसते. आपण अवकाशात गेलो नसलो त्यामुळे त्याची अनुभूती आपण घेतलेली नाही पण जेव्हा निळा प्रकाश चंद्राच्या पृष्ठभागावर पडून परावर्तित होतो तेव्हा तो निळा व हिरवा या प्रकाशांचे मिश्रण असते म्हणून आम्ही चंद्राची ती बाजू पिरोजा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा