What Is Dark Storm Group: अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांच्या मालकीच्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काल (सोमवारी) सायबर हल्ला झाला होता. यामुळे जगभरातील युजर्सना याचा फटका बसला होता. आता पॅलेस्टिनी समर्थक हॅकिंग ग्रुप डार्क स्टॉर्मने एक्सच्या हॅकिंगची जबाबदारी स्वीकारली आहे.

या हल्ल्यामुळे जगभरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. ज्यामुळे ४०,००० हून अधिक युजर्सना याचा फटका बसला होता. यानंतर एलॉन मस्क यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर मोठा सायबर हल्ला झाला असल्याचे स्पष्ट केले. एलॉन मस्क म्हणाले, “आमची टीम या सायबर हल्ल्यांचा प्रतिकार करत असली तरी सोमवारी मोठ्या ताकदिनीशी सायबर हल्लेखोरांनी आमच्या सिस्टिमवर हल्ले केले. यामागे एखादी मोठी गुन्हेगारी संघटना किंवा एखाद्या देशाचा हात असू शकतो.”

डार्क स्टॉर्म काय आहे?

डार्क स्टॉर्म टीम हा पॅलेस्टिनी समर्थक हॅक्टिव्हिस्ट (सायबर हल्ला करणारा) ग्रुप आहे, जो इस्रायल समर्थक समजल्या जाणाऱ्या संस्थांवर सायबर हल्ले करण्यासाठी ओळखला जातो. त्यांच्या कारवायांमध्ये डिस्ट्रिब्युटेड डिनायल-ऑफ-सर्व्हिस (DDoS) हल्ले आणि इतर प्रकारचे सायबर हल्ल्यांचा समावेश आहे. ते सामान्यपणे विविध देशांची सरकारे, पायाभूत सुविधा आणि इस्रायली हितसंबंधांशी जुळणाऱ्या संस्थांना लक्ष्य करतात.

डार्क स्टॉर्म केवळ विचारसरणीसाठी हल्ले करत नाहीत, तर ते पैसे घेऊनही सायबर हल्ला सेवा पुरवतात. त्यांच्या टेलिग्राम चॅनेलनुसार, हा ग्रुप सुरक्षित आणि असुरक्षित वेबसाइटवर DDoS हल्ले तसेच त्यांचा डेटाबेस चोरण्यासाठीही हल्ले करतो.

डार्क स्टॉर्मचे आतापर्यंतचे हल्ले

फेब्रुवारी २०२४ मध्ये, डार्क स्टॉर्म ग्रुपने इस्रायल, इस्रायलला पाठिंबा देणाऱ्या आणि नाटो संघटनेतील देशांना सायबर हल्ल्यांची धमकी दिली होती. या धमक्यांद्वारे जीवनावश्यक सेवा आणि सरकारी वेबसाइट्समध्ये व्यत्यय आणण्याचा डार्क स्ट्रॉर्मचा हेतू होता.

डार्क स्टॉर्मचे काही रशिया समर्थक हॅक्टिव्हिस्ट ग्रुप्सशीही भागिदारी केली असल्याचे वृत्त आहे. ज्यामुळे त्यांची सायबर हल्ले करण्याची क्षमता वाढली आहे.

डार्क स्टॉर्म ग्रुपने ऑक्टोबर २०२४ मध्ये जॉन एफ केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या DDoS हल्ल्यासह अमेरिकन पायाभूत सुविधांवरील सायबर हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली होती.

डार्क स्टॉर्मने एक्सवर कसा हल्ला केला?

सायबरसुरक्षा तज्ञांनी एक्सवर झालेला हल्ला मल्टी लेअर्ड डिस्ट्रिब्युटेड डिनायल-ऑफ-सर्व्हिस (DDoS) हल्ला असल्याचे म्हटले आहे. हॅकर्सनी एक्सच्या सर्व्हरला मोठ्या प्रमाणात बनावट विनंत्या पाठवल्या, ज्यामुळे प्लॅटफॉर्मची कार्य करण्याची क्षमता बिघडली.

X वर सायबर हल्ला करणारा डार्क स्टॉर्म ग्रुप काय आहे? कशी विस्कळीत केली जगभरात एक्सची सेवा

हल्ल्यात बॉटनेट आणि हायजॅक केलेल्या उपकरणांचे नेटवर्क वापरले गेले, ज्यामध्ये पर्सनल कंप्युटर, स्मार्ट कॅमेरे आणि राउटर यांचा समावेश होता. असे असले तरी एक्सने अद्याप हल्ल्यामागे डार्क स्टॉर्मचा हात होता की नाही याची पुष्टी केलेली नाही.

Story img Loader