TMC खासदार महुआ मोईत्रांनी मोदींना बदनाम करण्यासाठी अदाणींना टार्गेट केलं असं दर्शन हिरानंदानी यांनी एका प्रतिज्ञापत्रात कबूल केलं. तसंच लॉग इन पासवर्डही त्यांनी शेअर केला होता असंही त्यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दर्शन हिरानंदानी यांनी काय म्हटलं आहे?

खासदार जे प्रश्न विचारतात त्यात दर्शन हिरानंदानी यांनी काही प्रश्न महुला मोईत्रा यांच्या अकाऊंटवर अपलोड केले होते. तसंच दर्शन हिरानंदानी यांनी हे मान्य केलं की महुआ मोईत्रा या राजकारणात वेगाने प्रगती करण्याच्या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करु इच्छित होती. त्यामुळेच त्यांनी अदाणींना टार्गेट केलं. हिरानंदानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींना अदाणी प्रश्नावरुन टार्गेट करण्यासाठी महुआ मोईत्रा या राहुल गांधींच्याही संपर्कात होत्या.

हिरानंदानी यांनी गुरुवारी जारी केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं, “महुआ मोईत्रा यांनी अदाणी समूहाला लक्ष्य करून सरकारला अडचणीत आणतील, असे काही प्रश्न तयार केले होते. जे प्रश्न त्या संसदेत उपस्थित करू शकतील. त्यांनी संसद सदस्य म्हणून त्यांचा ईमेल आयडी मला दिला होता. जेणेकरून मी त्यांना माहिती पाठवू शकेन आणि त्या थेट संसदेत प्रश्न मांडू शकतील.”

हिरानंदानी समूहाचे सीईओ दर्शन हिरानंदानी यांनी हा दावाही केला आहे की सुचेता दलाल, शार्दूल श्रॉफ आणि पल्लवी श्रॉफ मदत केली. याशिवाय शशि थरुर आणि पिनाकी मिश्रा यांनीही महुआ मोईत्रा यांना या प्रकरणी मदत केली. काही विदेशी पत्रकारांचीही मदत महुआ यांनी घेतली होती.

दर्शन हिरानंदानी यांनी प्रतिज्ञापत्रात असंही म्हटलं आहे. महुआ मोईत्रांनी माझ्याकडून महागडी गिफ्ट्सही घेतली. तसंच मी त्यांच्या सरकारी निवास स्थानाची दुरुस्तीही केली. महुआच्या प्रवासाचा आणि सुट्ट्यांचा खर्चही मी केला होता असंही त्यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Darshan hiranandani admits accusations on mahua moitra true she trageted adani with rahul gandhi help scj
Show comments