राफेल प्रकरणी फ्रेंच कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा खुलासा

राफेल निर्मितीसाठी दसॉंने स्वत: अनिल अंबानी यांच्या कंपनीची निवड केली होती. केवळ अंबानीच नव्हे तर अन्य ३० कंपन्यांशी आमचा करार झाला आहे, आपण खोटे बोलत नाही, असे दसाँ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक ट्रॅपियर यांनी स्पष्ट केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने फ्रान्सशी नव्याने केलेल्या राफेल करारावरून देशात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही यामध्ये घोटाळ्याचा आरोप केला आहे. इतकेच नव्हे तर दसाँ खोटे बोलत असल्याचेही गांधी यांनी म्हटले आहे. त्यावर एका वृत्तवाहिनीशी बोलताना एरिक ट्रॅपियर यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

काँग्रेसने केलेले आरोप दुर्दैवी आहेत, काँग्रेसशी आमचे जुने संबंध आहेत, १९५३ मध्ये आम्ही भारत सरकारशी पहिला करार केला होता, आम्ही भारतासमवेत काम करतो, कोणत्याही राजकीय पक्षासमवेत नाही, असेही ट्रॅपियर म्हणाले. रिलायन्स हा दसॉशी झालेल्या जॉइण्ट व्हेन्चरचा केवळ एक भाग आहे, राफेलनिर्मितीसाठी मिळणारा एकही पैसा थेट रिलायन्सला दिला जाणार नाही, रिलायन्सने वेगळ्या उद्देशाने यामध्ये पैसा गुंतविला आहे, असेही ट्रॅपियर म्हणाले.

एरिक ट्रॅपियर आणि अनिल अंबानी