ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरॉन यांच्या नवीन सरकारने काटकसरीचा उपाय म्हणून इ.स. २०२० पर्यंत त्यांच्या मंत्र्यांचे पगार गोठवले आहेत.
‘द संडे टाइम्स’ या वृत्तपत्रात कॅमेरॉन यांनी लिहिले आहे, की राणीसाहेबांच्या भाषणानंतर आपल्या सरकारचे कामकाज बुधवारी सुरू होईल. त्यात पहिल्यांदा मंत्र्यांचे पगार गोठवले जाणार आहेत. त्यामुळे  वर्षांला आठ लाख पौंड वाचणार असून २०२० पर्यंत ४० लाख पौंड वाचतील. त्यामुळे ८ जुलैला अर्थसंकल्प मांडताना हुजूर पक्षाला पुरेसे स्वातंत्र्य मिळेल. कल्याण योजनांचे १२ अब्ज पौंड दोन वर्षांसाठी गोठवले जाणार असल्याचे अर्थमंत्री जॉर्ज ओसबोर्न यानी सांगितले आहे. त्यामुळे २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात तूट कमी होईल असा अंदाज आहे.
 राणी एलिझाबेथ यांच्या भाषणातच इतर लाभ २६ हजार पौंडावरून २३ हजार पौंडापर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव आहे. पालकांना आठवडय़ात ३० तास त्यांची मुले मोफत सांभाळण्याची योजना देण्यात आली आहे, ती साडेचार वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी आहे, शिवाय ३० लाख शिकाऊ उमेदवारांना रोजगार दिला जाणार आहे.

Story img Loader