ब्रिटिश नागरिकाचा अलीकडेच शिरच्छेद करणाऱ्या मुखवटाधारी इसमास ठार मारण्यासाठी किंवा त्याला ताब्यात घेता येणे शक्य व्हावे म्हणून इस्लामी स्टेटचा प्रमुख ‘जिहादी जॉन’ याचाच तातडीने शोध घ्या, असे आदेश ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी आपल्या गुप्तचर प्रमुखांना दिले आहेत.
ब्रिटिश कर्मचारी अ‍ॅलन हेनिंग याचा ज्या मारेकऱ्याने शिरच्छेद केला, त्या मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी कॅमेरून यांनी आपली यंत्रणा कामी लावली असून सदर मारेकरी ‘त्या’ व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्याचे शब्दोच्चारही ब्रिटिश धाटणीचे असल्याचे स्पष्ट होत होते. कॅमेरून यांनी आपल्या गुप्तचर यंत्रणेतील तिघा प्रमुखांना पाचारण करून आयएसआयएसच्या अपहरणकर्त्यांचा तातडीने शोध घेण्याच्या त्यांना सूचना दिल्या. हेनिंग यांचा शिरच्छेद केल्याचे वृत्त समजताच कॅमेरून यांनी अवघ्या १२ तासांत तातडीने संबंधितांची बैठक घेऊन आपला निर्णय गुप्तचर प्रमुखांच्या कानी घालून त्यांना या निर्णयाची तामिली करण्याचे आदेश दिले. हेनिंग यांचे मेहुणे कॉलीन लिव्हेसे आणि कॅमेरून यांच्याच एका मित्राने हेनिंग यांचे प्राण वाचविण्यात अपयश आल्याबद्दल सरकारवर टीका केली होती.

Story img Loader