प्रसिद्ध मानवतावादी डेव्हिड रॉकफेलर यांचा वेचेस्टर परगण्यात झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला. एका इंजिनाचे हे विमान होते. रिचर्ड (वय ६५) हे एकटेच पायपर पीए ४६-५०० टीपी विमानात होते. व्हाईट प्लेन्स जवळील विमानतळावरून त्यांनी उड्डाण केले होते असे विमानतळ व्यवस्थापक पीटर शेरर यांनी सांगितले. नंतर विमान रडारवरून दिसेनासे झाले व एका खेडय़ात कोसळले, ते एका घरावर कोसळले असते, पण ते थोडक्यात दुसरीकडे पडले. स्टँडर्ड ऑईल फाऊंडर व मानवतावादी जॉन डी. रॉकफेलर यांचे ते पणतू आहेत. ते मैनेनजीक पोर्टलँडकडे जात असताना हा अपघात झाला. वडिलांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त ते निघाले होते. रिचर्ड हे अनुभवी वैमानिक होते, पण सकाळी धुक्याने दृश्यमानता कमी होती. अतिशय भयानक अशी ही घटना होती असे रॉकफेलर कुटुंबीयांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा