मुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोट मालिकेत हवा असलेला कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याला पाकिस्तान कधीच भारताच्या ताब्यात देणार नाही, असे मत माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी सीएनएन न्यूज १८ वाहिनीशी बोलताना सांगितले. या वाहिनीने एका िस्टग ऑपरेशनद्वारे असा दावा केला, की दाऊद हा कराचीतील क्लिफ्टन भागातच राहात आहे. त्याचा पत्ता डी १३, ब्लॉक नं ४, क्लिफटन, कराची असा आहे.
चिदंबरम यांनी सांगितले, की दाऊदला पाकिस्तान सरकार भारताच्या ताब्यात देणार नाही. दाऊदने तेथे आश्रय घेतल्याचेही ते मान्य करणार नाही. जरी त्यांनी तो पाकिस्तानात असल्याचे मान्य केले तरीही ते त्याला भारताच्या ताब्यात देणार नाहीत. दाऊदचा ठावठिकाणा सापडल्याचे हे पहिले उदाहरण नाही, पण पाकिस्तानने नेहमीच तो तेथे असल्याचा इन्कार केला आहे. दाऊद पाकिस्तानात राहतो हे सगळय़ा जगाला माहीत आहे. आपण तसे पाकिस्तान सरकारला सांगितलेही आहे, पण त्यांनी त्याचा इन्कार केला आहे. तो क्लिफ्टन येथे राहतो हे अनेकांनी सांगितले आहे. पाकिस्तान व दुबईत त्याची ये-जा असते. पाकिस्तान दाऊदला भारताच्या ताब्यात देईल असे मानणे म्हणजे भ्रम आहे. हे भारत सरकारचे अपयश नाही. प्रश्न पाकिस्तानच्या बाजूने आहे. कुठलेही सरकार त्याने तेथे आश्रय घेतल्याचे मान्य करीत नाही.
सीएनएन न्यूज १८ वाहिनीने दोन पख्तुनी व्यक्तींना दाऊदचे घर कराचीत कोठे आहे हे शोधण्यास सांगितले असता त्यांनी डी १३, ब्लॉक ४, क्लिफ्टन असा पत्ता दिला आहे. भारताने पाकिस्तानला दिलेल्या कागदपत्रांतील पत्त्यांशी हा पत्ता जुळणारा आहे. त्याचे पाकिस्तानातील पाच पत्ते असले तरी क्लिफ्टन येथे सर्वात जास्त सुरक्षा आहे, त्यामुळे तो तेथे राहतो यात शंका नाही. क्लिफ्टन मार्कीजवळ कराचीत दाऊद
राहतो. या वृत्त वाहिनीने चमूने दर १०० मीटर अंतरावर थांबून दाऊदचे घर कुठे आहे असे विचारले तेव्हा सर्वानीच डी १३, ब्लॉक ४, क्लिफ्टन हा पत्ता सांगितला. दोन पख्तुनी व्यक्तींनी वेगवेगळय़ा दिशांनी जाऊन दाऊदचे घर दाखवले, रेकी केली. कराचीतील पोलीस अधिकाऱ्यांशी वृत्तवाहिनीने संपर्क केला असता त्यांनीही दाऊद क्लिफ्टन येथे राहात असल्याचे सांगितले.

Story img Loader