दाऊदची बहीण हसीना पारकर हीचा मुलगा आणि दाऊदचा भाचा अलीशाह पारकर हा NIA च्या ताब्यात आहे. त्याच्या चौकशीनंतर दाऊदबद्दल अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. मोस्ट वाँटेड यादीतील दहशतवादी असलेला दाऊद इब्राहीम हा कराची मधील डिफेन्स परिसरात असलेल्या अब्दुल्ला गाझी बाबा दर्गाहच्या नजीक राहत असल्याची माहिती अलीशाह याने एनआयएला दिली आहे. तसेच दाऊदने दुसरे लग्न केले असून त्याची नवी पत्नी ही पाकिस्तानमधल्या पठाणी कुटुंबातून येत असल्याचेही त्याने सांगितले. त्यामुळे एका अर्थाने आता दाऊद हा पाकिस्तानचा जावई झाल्याचे कळते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहिली पत्नी मुंबईतल्या नातेवाईकांशी अजूनही बोलते

दाऊदने पहिली पत्नी मेहजबीनला अद्याप घटस्फोट दिलेला नाही. मेहजबीन ही मुंबईमधील तिच्या नातेवाईकांसोबत संपर्कात आहे. दाऊदचा भाचा अलीशाह हा जुलै २०२२ रोजी दुबई येथे महजबीनला भेटला होता. तेव्हा त्याला दाऊदच्या दुसऱ्या लग्नाबाबत कळले. अलीशाहने एनआयएला सांगितले की, मेहजबीन तिच्या मुंबईतील नातेवाईकांसोबत व्हॉट्सअप कॉलद्वारे संवाद साधत असते.

हे ही वाचा >> अखेर पाकिस्ताननं मान्य केली चूक, पंतप्रधान शरीफ म्हणाले, “भारताशी तीन युद्ध लढल्यानंतर…”

मागच्या वर्षी दहशतवादी विरोधी पथकाने मुंबईतील विशेष न्यायालयासमोर दाऊद इब्राहिमच्या विरोधात चार्जशीट दाखल केली होती. दाऊदचा साथीदार छोटा शकील आणि इतर तीन सदस्य मिळून डी कंपनीच्या नावाने जागतिक स्तरावर दहशतवादाचे नेटवर्क चालवत होते. तसेच डी कंपनीच्या अनेक गुन्हेगारी कारवायामध्ये या लोकांचा सहभाग होता. या तिघांनाही ऑगस्ट २०२२ मध्ये दहशतवादी विरोधी पथकाने मुंबई येथून अटक केली होती.

हे वाचा >> विश्लेषण: भारतावर सात वेळा हल्ले करणारा मक्की आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित; चीननंही पाठिशी घातलेला मक्की आहे तरी कोण?

दाऊद इब्राहिमकडून हवालामार्गे खूप मोठी रक्कम आरोपी अलीशाहकडे पाठवली जात होती. या पैशांतून डी कंपनीचे अवैध धंदे चालत होते. एनआयएने याबाबतचा अधिक तपास केला असून हा पैसा मुंबई आणि भारताच्या इतर परिसरात दहशतवादी कारवाया करण्यासाठी वापरला जाणार असल्याचे समोर आले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dawood ibrahim living in karachi got married for second time nephew reveals key details to nia kvg