Dawood Ibrahim Hospitalised in Karachi: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याविषयी आत्तापर्यंत अनेक बातम्या चर्चेत आल्या. त्यातल्या काही खऱ्या ठरल्या तर काही फक्त अफवा. यंदा मात्र थेट पाकिस्तानमधील वृत्तवाहिन्या व पत्रकारांकडून दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाल्याचं खळबळजनक वृत्त देण्यात आल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. त्यातच पाकिस्तानमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याचंही सांगितलं जात असल्यामुळे दाऊद इब्राहिमची प्रकृती खरंच चिंताजनक असल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी नेमकी भूमिका मांडली आहे.

काय घडतंय पाकिस्तानात?

भारताच्या मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांच्या यादीत सर्वात वरच्या क्रमांकावर असणारा दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये असल्याचे अनेक पुरावे भारत सरकारनं पाकिस्तान सरकारला दिले आहेत. मात्र, तरीदेखील दाऊद पाकिस्तानात नसल्याचाच जाप पाकिस्तानमधील सरकार, लष्कर करत राहिले. आता मात्र पाकिस्तानमध्येच दाऊदवर विषप्रयोग करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं असून त्याला कराचीमधील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आल्याचं बोललं जात आहे. दाऊदची स्थिती गंभीर असून यासंदर्भात पाकिस्तानकडून मात्र कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. टीव्ही ९ शी बोलताना उज्ज्वल निकम यांनी याच मुद्द्यावर बोट ठेवलं आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

काय म्हणाले उज्ज्वल निकम?

उज्ज्वल निकम यांनी दाऊदची स्थिती गंभीर असल्याच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. “फक्त सोशल मीडिया नाही, तर पाकिस्तानच्या वृत्तवाहिन्यांनीही ही बातमी चालवली आहे. त्याला आधार म्हणजे पाकिस्तानमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. साधारणपणे पाकिस्तानात अंतर्गत यादवी सुरू असेल किंवा पाकिस्तानला जगापासून काही गोष्ट लपवायची असेल, तेव्हा पाकिस्तान संपूर्ण देशातली इंटरनेट सेवा बंद करते. भारतात असं कधी घडत नाही. पाकिस्तानमध्ये सध्या कोणतंही यादवी युद्ध चालू नाही. अमेरिकेकडूनही त्यासंदर्भात असा कोणताही खुलासा नाही”, असं उज्ज्वल निकम म्हणाले आहेत.

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग? कराचीतील रुग्णालयात दाखल झाल्याचे वृत्त

पाकिस्तानची पंचाईत!

दरम्यान, दाऊदवरील विषप्रयोगाच्या वृत्तामुळे पाकिस्तानचीच पंचाईत झाल्याचं निकम म्हणाले आहेत. “आता पाकिस्तानची पंचाईत झाली आहे. कारण आतापर्यंत पाकिस्तानकडून परवेज मुशर्रफ यांच्यासह सगळ्यांनी मोठ्या ठामपणे सांगितलं होतं की दाऊद इब्राहिम आमच्याकडे राहात नाही. दाऊद मुंबईच्या साखळी बॉम्बस्फोटात वाँटेड गुन्हेगार आहे. मी हा खटला चालवला, तेव्हा दाऊदनं पाकिस्तानच्या मदतीने कसा कट रचला, याचा पुरावा आम्ही न्यायालयात आरोपींची साक्ष घेऊन सादर केला. त्यामुळे आपलं पितळ उघडं पडू नये म्हणून दाऊदला लपवण्यासाठी पाकिस्तान हे प्रयत्न करत आहे”, असं निकम म्हणाले.

“पाकिस्तानची खरी गोची इथेच झालीये. कारण आता पाकिस्तान दाऊदवर भारतानं विषप्रयोग केला असा दावा करूच शकत नाही. कारण दाऊद पाकिस्तानच्या भूमीत नाही, ही अधिकृत भूमिका पाकिस्ताननं घेतली होती”, असंही ते म्हणाले.

Story img Loader