पाकिस्तानची कबुली
कुविख्यात गुंड दाऊद इब्राहिम पाकिस्तानात राहत होता अशी स्पष्ट कबुली आता पाकिस्तानने पहिल्यांदाच दिली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरिफ यांचे विशेष दूत, शहरयार खान यांनी दाऊद पाकिस्तानात वास्तव्याला होता असे स्पष्ट केले आहे.
एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी शहरयार खान म्हणाले, हो दाऊद पाकिस्तानमध्ये होता, मात्र त्यानंतर तो पाकिस्तानमधून पळून गेला असावा. आता दाऊद हा संयुक्त अरब इमिराती म्हणजेच यूएई मध्ये असावा अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच तो आता पाकिस्तानात असला असता तर, नवाज शरीफ यांच्या सरकारने दाऊद सारख्या गुंडाला कधीच अभय देणार नाही. त्यामुळेच दाऊदने पाकिस्तानमधून पळ काढला असावा असा दावाही शहरयार खान यांनी व्यक्त केला आहे.