कुख्यात माफिया दाऊद इब्राहिम याला ताब्यात देण्यासाठी भारताकडून वारंवार मागणी करूनही ‘तो आमच्या देशात नाहीच’ असा पाकिस्तानचा कांगावा खोटा पाडणारे नवे पुरावे गुप्तचर यंत्रणांच्या हाती आले आहेत. दाऊदच्या संभाषणाची ध्वनीफितच यंत्रणांना मिळाली असून त्याद्वारे दाऊद कराचीतील क्लिफ्टन भागात रहात असल्याचे समोर आले आहे.
पाश्चिमात्य गुप्तचर यंत्रणांनी उपग्रहाद्वारे चालवलेल्या टेहळणीत दाऊद आणि दुबईतील त्याच्या व्यावसायिक सहकाऱ्याचे संभाषण हाती लागल्याचे वृत्त ‘इंडिया टुडे’ या वृत्तसंकेतस्थळाने दिले आहे.  आपल्याकडे दुबईतील शेख झैद रोड या आलिशान भागातील ११०० कोटी रुपये किमतीचा ५ लाख चौरस फुटाचा भूखंड असल्याचे दाऊदने या संभाषणात म्हटले आहे.  ‘कराचीमध्ये माझ्या मालकीच्या शेकडो कोटींच्या बेनामी मालमत्ता आहेत,’असेही दाऊद म्हणतो.  तो दुबईतील एक रियल इस्टेट एजंट यासीर याच्याशीही चर्चा करताना आढळला आहे. हा एजंट पाकिस्तानातील बडय़ा उद्योगपतीचा मुलगा असल्याचे समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा