कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम व मुंबई २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हफीज सईद हे दोघेही पाकिस्तानमध्येच असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज मंगळवार लोकसभेत दिली. दहशतवादी हफीज सईद जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या असून ही संघटना पाकिस्तानात कार्यरत असल्याची माहितीही शिंदेंनी दिली आहे.
तसेच पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांबरोबर झालेल्या भेटीत या दोघांना भारताच्या स्वाधीन करण्याची मागणीही आपण केल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. हे दोघेही पाकिस्तानातील कराची अथवा इतर शहरात असल्याची शक्यताही शिंदे यांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकार दहशतवादाचा सामना करण्यात अपयशी ठरत असल्याची टीका विरोधकांनी केली असता शिंदे म्हणाले, भाजपच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारप्रमाणे हे सरकार नाही. दहशतवादाचा सामना कऱण्यासाठी योग्यती पाऊले उचलत असल्याचा दावाही शिंदे यांनी केला आहे. यावरून विरोधकांना गदारोळ घालण्यास सुरूवात केली असता केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी हस्तक्षेप करत विरोधकांना गृहमंत्र्यांचे बोलणे ऐकून घ्यावे असे आव्हान केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा