Chennai Suicide Case : एका १९ वर्षांच्या विद्यार्थ्याने NEET परीक्षेत नापास झाल्याने निराश होऊन आत्महत्या केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या मुलाच्या वडिलांनीही आपलं आयुष्य संपवलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या विद्यार्थ्याचे वडील त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळले. तामिळनाडूतल्या चेन्नईमध्ये ही घटना घडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिळालेल्या माहितीनुसार जगदिश्वरन नावाच्या एका विद्यार्थ्याने ४२७ गुण मिळवत बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र NEET च्या दोन प्रवेश परीक्षा हा विद्यार्थी पास होऊ शकला नाही. दोन वेळा प्रयत्न फुकट गेल्याने तो नाराज झाला होता. शनिवारी त्याला वडिलांनी फोन केला, मात्र त्याने वडिलांचा फोन उचलला नाही. त्यानंतर हा विद्यार्थी त्याच्या घरी मृतावस्थेत आढळला. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी या मुलाचे वडील सेल्वासेकर यांनीही आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेल्वासेकर हे त्यांचा मुलगा जगदीश्वरनच्या मृत्यूचं दुःख पचवू शकले नाहीत. त्याच नैराश्यातून त्यांनी गळफास घेऊन राहत्या घरी आपलं आयुष्य संपवलं. या घटनेनंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी शोक व्यक्त केला आहे. तसंच विद्यार्थ्यांना हे आवाहन केलं आहे की कुणालाही परीक्षेत अपयश आलं तर आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, नव्याने प्रयत्न करा पण आपलं आयुष्य संपवू नका.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Day after chennai student kills self over neet result father found dead said cops scj