अमित शाह हे माजी राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन यांच्यावर कथितपणे संतापल्याचा व्हिडीओ काल सोशल मीडिया प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओवरून आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री दयानिधी मारन यांनीही या व्हिडीओवरून अमित शाह यांना सुनावलं आहे. “हीच वागणूक तुम्ही निर्मला सीतारमण यांनाही दिली असती का?” असा प्रश्र त्यांनी अमित शाह यांना विचारला आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, दयानिधी मारन परिपत्रक जारी करत अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. अमित शाह तमिलिसाई सौंदरराजन यांच्याशी ज्या पद्धतीने वागले, ते अतिशय दुर्दैवी आहे. हा व्हिडीओ बघून अतिशय वाईट वाटलं. त्या तेलंगणाच्या माजी राज्यपाल आहेत, असे दयानिधी मारन म्हणाले. पुढे बोलताना, हीच वागणूक अमित शाह यांनी निर्मला सीतारमण किंवा एस जयशंकर यांना दिली असती का? असा प्रश्नही त्यांनी विचारला. याशिवाय तमिलिसाई सौंदरराजन या फक्त तामिळनाडूमधून येत असल्यानेच अमित शाहांनी त्यांना अशाप्रकारे वागणूक दिली, असा आरोपही त्यांनी केला.

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Thackeray Group Criticized Devendra Fadnavis
Modi 3.0: “रक्षा खडसेंचा केंद्रीय मंत्रिमंडळात प्रवेश म्हणजे फडणवीसांच्या कपटी राजकारणाला…”, ठाकरे गटाचा टोला
Manoj Jarange Warning to Devendra Fadnavis
लोकसभेच्या निकालानंतर मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा, “..तर विधानसभेला इंगा”
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
PM narendra modi and joe biden
Lok Sabha Election Result 2024 Updates : इंडिया आघाडीचं ठरलं; सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत, पण योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याचं सूचक विधान!
What Kiran mane Said About Ketki Chitale?
केतकी चितळेला किरण मानेंचा सवाल, “अभिमानाने ‘चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण’ जात सांगणारी ताई आता हिंदू..”
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…

हेही वाचा – “देशातील कायदा-सुव्यवस्थेला गृहमंत्र्यांपासून धोका”, संजय राऊतांचा अमित शाहांवर गंभीर आरोप; म्हणाले, “दुसऱ्यांदा…”

नेमकं प्रकरण काय?

बुधवारी ( १२ जून रोजी ) तेलगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. या सोहळ्यादरम्यान अमित शाह माजी राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन यांच्यावर कथितरित्या संतापल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

नेमकं काय घडलं?

शपथविधी सोहळ्यादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे व्यासपीठावर बसले असताना त्यावेळी माजी राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजनदेखील तिथे पोहोचल्या. त्यांनी माजी उपराष्ट्रपती वैंकया नायडू आणि अमित शाह यांना अभिवादन केलं. त्या पुढे जाणार इतक्याच अमित शाह यांनी त्यांना बोलवून त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी अमित शाह तमिलिसाई सौंदरराजन यांना रागात काही तरी सांगत असल्याचे दिसून आलं.

हेही वाचा – गडकरींकडील जुनं खातं कायम, नड्डांकडे आरोग्य, शिंदेंच्या मंत्र्याकडे ‘या’ खात्याचा स्वतंत्र कार्यभार; वाचा कुणाला कुठलं मंत्रिपद?

भाजपा राज्य सोशल मीडिया सेलचे उपाध्यक्ष कार्तिक गोपीनाथ यांनी एक्स या समाज माध्यमावर हा व्हिडीओ शेअर केला होता. ‘अमित शाह तमिलिसाई अक्का यांना कडक चेतावणी देत आहेत, असं वाटतं. पण सार्वजनिक इशारा देण्याचे कारण काय असू शकते?’ असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं होता.

विशेष म्हणजे मागील काही दिवसापासून तमिलिसाई सौंदरराजन आणि तामिळनाडूचे राज्यप्रमुख अन्नामलाई यांच्या समर्थकांमध्ये वाद सुरू असल्याचे सांगितले जात असताना हा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे सोशल मीडियावरही विविध चर्चांनाही उधाण आलं. दरम्यान, या व्हिडीओबाबत भाजपाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.