देशात करोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागलेली आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात मुखपट्टी लावण्याचे आवाहन केले जात आहे. असे असताना आता कोर्बेव्हॅक्स या लसीला डीसीजीआयने आपत्कालीन परिस्थितीत बुस्टर डोस म्हणून वापर करण्यास मान्यता दिली आहे. ही लस हैदरबाद येथील बायोलॉजिकल ई लिमिटेड या औषधनिर्मिती करणाऱ्या कंपनीने तयार केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >> बॉडी स्प्रेच्या जाहिरातीत सामूहिक बलात्काराला प्रोत्साहन? माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने केली मोठी कारवाई

डीसीजीआयने कोर्बेव्हॅक्स या लसीला आपत्कालीन स्थितीत बुस्टर डोस म्हणून पावरण्यास मान्यता दिली आहे. डीसीजीआयच्या या निर्णयानंतर आता कोव्हिशील्ड किंवा कोव्हॅक्सीन लस घेतलेल्या १८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना लस घेतल्याच्या सहा महिन्यानंतर कोर्बेव्हॅक्स ही लस बुस्टर डोस म्हणून घेता येईल.

हेही वाचा >> “घराचा पत्ता लोक कल्याण मार्ग ठेवल्याने लोकांचे कल्याण होत नाही”; राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका

डीसीजीआयच्या या निर्णयानंतर “या लसीच्या माध्यमातून बुस्टर डोसची गरज पूर्ण होईल. करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या प्रवासात आपण आणखी एक टप्पा पूर्ण केला आहे,” अशी प्रतिक्रिया बायोलॉजिकल ई. लिमिटेड या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिली आहे.

हेही वाचा >> संतापजनक! दिल्लीत ९ वर्षीय मुलीवर कारखान्यात बलात्कार, ४६ वर्षीय आरोपी अटकेत

दरम्यान, याआधी डीसीजीआयने ५ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी या लसीच्या वापराला मान्यता दिली होती. तर मे महिन्यात या कंपनीने लसीची किंमत ८४० रुपयांवरुन २५० रुपये केली होती. ही लस तयार करण्यासाठी बायोलॉजिकल ई लिमिटेड या कंपनीला टेक्सास चिल्ड्रन्स हॉस्पिटल आणि बेलॉर कॉलेज ऑफ मेडिसीन या संस्थांनी मदत केलेली आहे.