भारतीय निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वी पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामधील छत्तीसगड राज्यात ७ आणि १७ नोहेंबर अशा दोन टप्प्यांमध्ये मतदान होईल आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाईल, असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. विधानसभांच्या निवडणुकीवरून छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री टीएस सिंह देव यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

उपमुख्यमंत्री टीएस सिंह देव यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले, ”पंतप्रधान नरेंद्र मोदी एक स्टार प्रचारक आहेत, पण त्यांच्या प्रचाराचा निवडणुकीच्या निकालावर फारसा प्रभाव पडणार नाही. ते केंद्र सरकारचे नेतृत्व करतात, त्यामुळे छत्तीससगडमध्ये मोदींच्या प्रचाराची जादू फारशी प्रभावशाली ठरणार नाही.”

Devendra Fadnavis Dharni, Chikhaldara Skywalk Work,
‘चिखलदरा स्‍कायवॉकचे काम महाविकास आघाडीने थांबविले’, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणीसांचा आरोप
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Sanjay Raut and Mallikarjun Kharge
खरगेंच्या मुखी समर्थ रामदासांचा श्लोक, पण संजय राऊत निरुत्तर; जाहीरनामा प्रसिद्ध करताना नेमकं काय घडलं?
Manifesto Mira Bhayander, Mira Bhayander,
मिरा भाईंदरसाठी महाविकास आघाडीचा जाहीरनामा; रेल्वे टर्मिनस, दिवाणी न्यायालयाची घोषणा
Challenge for Kiran Samant from Rajapur Assembly Election Constituency print politics news
लक्षवेधी लढत: राजापूर : उदय सामंत यांच्या भावासमोर कडवे आव्हान
Ramesh Chennithala
Ramesh Chennithala : “हरियाणाच्या निवडणुकीतून खूप शिकायला मिळालं, त्यामुळे ८० टक्के बंडखोरांनी…”, रमेश चेन्निथला यांचं महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत मोठं भाष्य
Narendra modi BHIM UPI Babasaheb Ambedkar
“BHIM UPI चं नाव बाबासाहेबांच्या नावावर”, मोदींचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेने खोडून काढला? पुरावा देत म्हणाले…
Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं

हेही वाचा : Assembly Election Dates 2023: निवडणूक आयोगाची मोठी घोषणा, मध्य प्रदेशासह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

तसेच पंतप्रधान मोदींनी आपल्या पक्षासाठी ज्या राज्यांमध्ये प्रचार केला तिथे भाजपा निवडणुका जिंकण्यात अपयशी ठरली आहे, असंही टीएस सिंह देव म्हणाले. देव यांनी कर्नाटक, हिमाचल प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यांचे उदाहरण दिले. तसेच छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांच्या यादीबाबत विचारले असता, त्यांनी सांगितले की, आमचा पक्ष उमेदवारांची यादी पितृ पक्ष संपल्यानंतर १२ किंवा १३ ऑक्टोबरपर्यंत जाहीर करेल.

निवडणुकीत दिलेली आश्वासने आम्ही पूर्ण केल्याचे सांगत या निवडणुकीसाठी काँग्रेस तयार असल्याचे सांगताना ते म्हणाले, ”आमची तयारी पूर्ण आहे. अतिआत्मविश्वास नाही पण आत्मविश्वास नक्कीच आहे. आम्ही लोकांमध्ये मिसळून लोकांसाठी काम केले आहे. अनेक अशा गोष्टी आहेत ज्यांची अंमलबजावणी आम्ही केली आहे.” तसेच मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह काम करण्यासाठी आपण वचनबद्ध असून त्यांच्यात आणि माझ्यात कोणत्याही प्रकारचा तणाव नाही, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा : Video: हमासच्या दहशतवाद्यांनी अर्धनग्न धिंड काढलेली ‘ती’ तरुणी जिवंत? आईच्या दाव्यानं खळबळ; म्हणाली, “गाझा पट्टीत…!”

छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार असून, पहिल्या टप्प्यात विधानसभेच्या २० जागांवर तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ७० जागांवर मतदान होणार आहे. विधासनभा निवडणुकीसाठी भाजपाने आपल्या उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या असून काँग्रेसने अजून एकही यादी जाहीर केलेली नाही. २०१८ मध्ये देखील छत्तीसगडमध्ये ९० जागांवर दोन टप्प्यांमध्ये मतदान झाले होते. पहिल्या टप्प्यात दक्षिण छत्तीसगडमधील १८ जागांचा तर दुसऱ्या टप्प्यात ७२ जागांचा समावेश होता. २०१८ च्या निवडणुकांचे निकाल ११ डिसेंबर रोजी जाहीर झाले होते. यामध्ये भाजपाला १५ जागांवरच रोखून ६८ जागा जिंकत कॉग्रेसने सत्ता स्थापन केली.