दोन वर्षापूर्वी पोलिसांनी एका कुख्यात गुंडाचा गोळ्या घालून एन्काउंटर केला होता. पण, आता दोन वर्षानी त्याचं थडगं उघडलेलं दिसलं. त्यातील गुंडाचा मृतदेहही गायब होता. पोलिसांनी तपास केल्यावर धक्कादायक बाब समोर आली आहे. एका १५ वर्षीय मुलीने आरोपीचा मृतदेह थडग्यातून पुन्हा बाहेर काढला होता. ही घटना ब्राझीलच्या गोइआस राज्यातील आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

२७ वर्षीय लाजारो बारबोसा डी सूझा हा शहरातील कुख्यात गुंड होता. त्यावर खून, बलात्कार, मारहाण, अपहरणासारखे अनेक गुन्हे दाखल होते. ९ जून २०२१ साली सीलैंडिया येथे एका कुटुंबातील चार जणांचा खून करून लाजारो बारबोसा डी सूझा फरार झाला होता. या घटनेच्या काही महिन्यानंतर बारबोसा पोलीस एन्काउंटरमध्ये मारला गेला.

Shopkeeper shot dead in Mira Road
मिरा रोड गोळीबार प्रकरण : ११ दिवसानंतरही हल्लेखोर फरार
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
murder of youth in Bhusawal, murder Bhusawal,
भुसावळमध्ये तरुणाच्या हत्येनंतर पाच संशयितांना अटक
three suspect arrested in attempted kidnapping school boy
उमराळ्यात शाळकरी मुलास पळविण्याचा प्रयत्न; तीन संशयितांना अटक
passenger beaten to death on dakshin express
धावत्या दक्षिण एक्स्प्रेसमधील थरार , प्रवाशाचा खून
Image of a well
पत्नीशी वाद झाला म्हणून तरुणाने दुचाकीसह मारली विहिरीत उडी, वाचवायला गेलेल्या चौघांसह पाच जणांचा मृत्यू
Police Sub Inspector dies in accident while returning home from duty pune news
पिंपरी : बंदोबस्तावरून घरी जाताना पोलीस उपनिरीक्षकाचा अपघाती मृत्यू
Image of a person in handcuffs or a liquor shop
पठ्ठ्याला मोहच आवरला नाही! चोरीसाठी दारूच्या दुकानात घुसला चोर अन् अति प्यायल्याने तिथेच झाला आडवा

हेही वाचा : २० वेळा चाकूनं भोसकलं, नंतर दगडानं ठेचलं… अल्पवयीन मुलीच्या निर्घृण हत्येनं राजधानी दिल्ली हादरली!

पण, दोन वर्षानंतर आता बारबोसाचं नाव पुन्हा चर्चेत आलं आहे. कारण, थडग्यातून मृतदेह बाहेर काढल्याने. एका १५ वर्षीय तरुणीने थडग्यातून बारबोसाचा मृतदेह बाहेर काढला. जेव्हा लोकांना थडग्यातून मृतदेह झाल्याची माहिती मिळाली, तेव्हा एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलीस तपास समोर धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. पोलिसांनी सांगितलं की, १५ वर्षीय तरुणीने आपल्या मित्राबरोबर थडगं खोदलं होतं. कारण, बारबोसा तिच्या स्वप्नात आला येऊन मदत मागत होता. बारबोरसाने म्हटलं की, तो जिवंत असून, त्याला बाहेर काढावं. त्यानंतरच तरुणीने २१ वर्षीय मित्राच्या मदतीने थडग्यातून बारबोसाचा मृतदेह बाहेर काढला.

हेही वाचा : दिल्लीत अल्पवयीन मुलीची चाकूने भोसकून आणि दगडाने ठेचून हत्या करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी केली अटक

पोलीस अधिकारी राफोल नेरिसने माध्यमांना सांगितलं की, “तरुणी अल्पवयीन आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून तरुणीला ताब्यात घेण्यात आलं. सध्या तिला अटक करण्यात आली आहे. स्वप्न पाहिल्यानंतर थडग्यातून मृतदेह बाहेर काढल्याचं तिनं कबूल केलं आहे. तेथील माती दोघांच्या कपड्यांना लागली होती. तपासानंतर मृतदेह परत पुरण्यात आला आहे.” ‘आज तक’ने याबद्दल वृत्त दिलं आहे.

Story img Loader