रस्त्यावरील खड्डे हे अनेकांसाठी आजवर जीवघेणे ठरलेले आहेत. पण हरियाणामधील एका ८० वर्षीय व्यक्तीला खड्ड्यामुळे जीवदान मिळाले आहे. या व्यक्तीला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. त्यानंतर रुग्णालयातून घरी अंतयात्रेसाठी नेत असताना अचानक हा व्यक्ती जिवंत असल्याचे कळले. हरियाणाच्या कर्नाल जिल्ह्यातील निसिंग शहरातील रहिवासी दर्शन सिंग ब्रार यांना पटियाला मधील रुग्णालयाने मृत घोषित केले. त्यानंतर त्यांना कर्नाल येथे त्यांच्या घरी आणण्यात येत होते. अंत्यसंस्कारासाठी घरी नातेवाईक, मित्रपरिवार जमा झाले होते. सर्व जण रुग्णवाहिकेची वाट पाहत होते, पण रुग्णवाहिका अचानक खड्ड्यात आदळली आणि चमत्कार झाला.

ब्रार यांच्या नातूने माहिती दिल्यानुसार, रुग्णवाहिका रुग्णालयातून घरी जात असताना रस्त्यात एका खड्ड्यावर आदळली. त्यानंतर त्याच्या लक्षात आले की, आजोबा ब्रार यांच्या हाताची हालचाल होत आहे. त्याने आजोबांच्या हृदयाचे ठोके तपासले असता ते धडधडत असल्याचे लक्षात आले. नातवाने लगेचच रुग्णवाहिका जवळच्या रुग्णालयात वळविण्यासाठी सांगितले. तिथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर ब्रार जिवंत असल्याचे सांगितले. दर्शन सिंग ब्रार यांची प्रकृती अजूनही नाजूक आहे, मात्र त्यांच्यावर आता पुन्हा उपचार सुरू झाले आहेत.

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Woman dies after falling off her bike in Kondhwa Pune news
कोंढव्यात दुचाकी घसरुन महिलेचा मृत्यू; दुचाकीस्वार पती जखमी
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
malad east man died after struck by Electric shock
विजेचा धक्का लागून नाल्यात पडला, मालाड मधील दुर्घटनेत एकाचा मृत्यू
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना

एनडीटीव्ही वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, ब्रार यांचा दुसरा नातू बलवान सिंग याने सांगितले की, ८० वर्षांचे आजोबा गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे मोठ्या भावाने त्यांना पटियाला येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. चार दिवसांपासून आजोबा व्हेंटिलेटरवर होते. त्यांचे हृदयाचे ठोके बंद पडल्यामुळे डॉक्टरांनी व्हेंटिलेटर हटवून त्यांना मृत घोषित केले.

बलवान सिंग यांनी पुढे सांगितले, रुग्णालयातून माझ्या भावाने फोन करून आजोबांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. त्यानंतर रुग्णालयापासून १०० किमींवर असलेल्या रुग्णालयात त्यांना नेण्यात येत होते. तोपर्यंत आम्ही नातेवाईकांशी संपर्क साधून अंत्यसंस्कारासाठी जमण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे अनेक लोकही जमले. आम्ही घरासमोर मंडप आणि लोकांना बसण्यासाठीची व्यवस्था केली. तसेच पार्थिवाचे दहन करण्यासाठी लाकूड आणि इतर वस्तूंची जमवाजमव केली.

मात्र निसिंग येथे असताना धांद गावानजीक रुग्णवाहिका खड्ड्यावर आदळली. त्यानंतर बलवान यांच्या भावाच्या लक्षात आले की, आजोबा हात हलवत आहेत. त्यांचे हृदयाचे ठोके पुन्हा सुरू झाले आहेत. जेव्हा त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले, तेव्हा डॉक्टरांनीही ते जिवंत असल्याचे सांगितले. बलवान सिंग यानंतर म्हणाले की, हा एक चमत्कारच आहे. खड्ड्यामुळे आजोबांना जीवदान मिळाले. आता आजोबांच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा होवो, अशी आमची इच्छा आहे. जे लोक अंत्यसंस्कारासाठी जमले होते, त्या सर्वांनादेखील याचा आनंद झाला. आम्ही यासाठी देवाचे आभार मानतो, त्यांच्यामुळेच आजोबांचे हृदय पुन्हा धडधड करायला लागले.