दक्षिण अमेरीका खंडातील चिली देशात ८.२ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या भुकंपाची नोंद करण्यात आली आहे. या भूकंपात दोन जणांना आपला जीव गमवावा लागला असून तीन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. चिलीमधील या भूकंपानंतर दक्षिण आणि मध्य अमेरिकन पॅसिफिक समुद्रात त्सुनामीचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. चिली येथील स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ६.४५ वाजता भूकंपाचा धक्का जाणवला. समुद्रकिना-यापासून १९ किमी आत आणि समुद्रतळापासून १० किमी अंतरावर या भूकंपाचा केंद्रिंबदू असल्याची माहिती मिळत आहे. भूकंपानंतर चिलीसह पेरु, इक्वेडोर, कोलंबिया, पनामा, कोस्टारिका, निकारागुआ या देशांमधून नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले जात आहे.

 

कोयना परिसरातही सौम्य धक्के
दरम्यान, चिलीसोबतच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागातही भूकंपाचे सौम्य जाणवले आहेत. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी साडेसात वाजता साताऱ्यातील कोयना आणि पाटण परिसरात भूकंपाचे धक्के बसले असून रत्नागिरीच्या संगमेश्वर आणि चिपळूण परिसरातसुद्धा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.