Attack On Shinzo Abe News : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये शिंजो आबे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनास्थळी असलेल्या एनएचकेच्या पत्रकाराने बंदुकीच्या गोळीसारखा आवाज ऐकला आणि आबे यांना रक्तस्त्राव होताना दिसला. हा हल्ला नारा शहरात झाला. जपानची वृत्तसंस्था एनएचकेने यासंदर्भात माहिती दिली आहे. पश्चिम जपानमधील नारा शहरात भाषणादरम्यान त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आणि ते खाली कोसळले. ते संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीपूर्वी एका सभेला संबोधित करत होते.

ही घटना शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता (भारतीय वेळेनुसार ८.२९ वाजता) घडली. आबे हे शहरातील एका रस्त्यावर भाषण करत असताना त्यांच्यावर हल्ला झाला आहे. त्यावेळी बंदुकीच्या गोळीसारखा आवाज ऐकू आला आणि घटनास्थळी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले, असे एनएचकेने सांगितले. घटनास्थळावरील एनएचकेच्या पत्रकाराने सांगितले की, आबे यांच्या भाषणादरम्यान त्यांना सलग दोन गोळ्यांचे ऐकू आले आहेत.

हे ही वाचा >> भारताकडून शिंजो अबे यांना पद्मविभूषण पुरस्कार

गोळी लागल्याने आबे यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळावरील एका व्यक्तीने सांगितले की त्याने बंदुकीच्या गोळ्या ऐकल्या आणि आबे यांना रक्तस्त्राव होत असल्याचे पाहिले. गोळी लागल्याने ते बेशुद्ध झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. सध्या त्यांच्या प्रकृतीची माहिती मिळू शकलेली नाही.

पाहा व्हिडीओ –

पोलिसांनी सांगितले की, एका संशयिताला अटक केली असून, त्याच्याकडून एक बंदूक जप्त करण्यात आली आहे. संशयिताची चौकशी करण्यात येत आहे. या संशयिताने भाषणादरम्यान आबे यांच्यावर मागून गोळी झाडल्याचे सांगण्यात येत आहे. संशयित हल्लेखोर ४० वर्षांचा आहे.

शिंजो आबे कोण आहेत?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

६७ वर्षीय शिंजो लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (एलडीपी) पक्षाशी संबंधित आहेत. आबे हे आक्रमक नेते मानले जातात. शिंजो यांना अल्सरेटिव्ह कोलायटिस हा एक आतड्याचा आजार होता ज्यामुळे त्यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आबे यांनी २००६, २०१४, २०१५ आणि २०१७ मध्ये देशाला भेट देऊन भारताशी घनिष्ट संबंध प्रस्थापित केले.