हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानातील तुरुंगात असलेला भारतीय कैदी सरबजित सिंग याच्यावर शुक्रवारी त्याच्या साथीदाराने हल्ला केला. सरबजितच्या डोक्याला जबर मार बसला असून त्याला येथील जिना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
संसदेवरील हल्ल्यातील मुख्य आरोपी अफजल गुरू याला फाशी दिल्यानंतर लाहोरमधील कोट लाखपत तुरुंगात कैद असलेल्या सरबजितवर हल्ला करण्याचा तुरुंगातील इतर कैद्यांचा कट होता. शुक्रवारी सरबजित एका बराकीतून दुसरीकडे जात असताना त्याच्या डोक्यावर या कैद्याने फटका मारला. त्यात सरबजित जबर जखमी झाला.
दरम्यान, सरबजितवर झालेल्या हल्ला प्रकरणावर भारत-पाक सरकारी सूत्रांच्या पातळीवर मौनच बाळगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा