नैर्ऋत्य चीनमधील युनान प्रांतात रविवारी ६.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धके बसल़े  त्यात तब्बल १५० जण मृत्युमुखी पडले आहे, तर शेकडो जण जखमी झाले आहेत. येथील ‘शिनहुआ’ या सरकारी वृत्तसंस्थेने ही माहिती दिली़  दूरचित्रवाणीवर दाखवण्यात आलेल्या छायांकनात
येथील झाओटोंग शहरात अनेक इमारतींची हानी झाल्याचे दिसून आले.
भूकंपाचे केंद्रस्थान १२ कि.मी. खोलीवर होते, असे ‘चायना नेटवर्क सेंटर’ने म्हटले आहे. पाचव्या मजल्यावर आपल्याला धक्का जाणवला, असे लुदियान येथील एका रहिवाशाने सांगितले. काही लोक इमारतींबाहेर पळाले. विद्युतपुरवठा खंडित झाला, दूरसंचार सेवा विस्कळीत झाली.
मोबाइल सेवा बंद पडल्याने लोकांशी संपर्क होऊ शकत नव्हता. आपली मोटार जणू तरंगते आहे असे एका मोटारचालकाने भूकंपाचा धक्का बसल्यानंतर सांगितले. घटनास्थळी २००० तंबू, ३००० घडीचे बिछाने, ३००० कोट पाठवण्यात आले आहेत. पोलीस आणि निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांनी भूकंपाच्या ठिकाणी धाव घेतली आह़े  युनान भूकंप व्यवस्थापन प्रशासनाचे ३० जणांचे पथक तेथे पोहोचले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा