करोनाने जगभरात अनेकांचा जीव घेतलाय (Corona death) मात्र यानंतरही अनेकजण करोनाला हलक्यात घेत आहेत. करोनाने काहीच होत नाही, इथपासून माझी रोग प्रतिकारकशक्ती चांगली आहे, मला काहीही होणार नाही ते अगदी करोनाच नाही असे अनेक दावे केले जातात. मात्र, प्रत्यक्षात करोना लाखो लोकांचे जीव घेत आहेत. नुकताच प्रसिद्ध किक बॉक्सिंगचा चॅम्पियन फ्रेडरिक सिनिस्राचा (Frederic Sinistra) करोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. मागील अनेक दिवसांपासून फ्रेडरिक देखील करोना लसीला विरोध करत असल्याने चर्चेत होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फ्रेडरिक ४१ वर्षांचा होता. त्याच्यावर बेल्जियममध्ये उपचार सुरू होते. नोव्हेंबरमध्ये त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, फ्रेडरिकचा याला विरोध होता. उपचारा दरम्यानच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या अधिकृत पेजवरून याबाबत चाहत्यांना माहिती देण्यात आली.

हेही वाचा : चिंताजनक, ओमायक्रॉनमुळे भारतात ‘या’ महिन्यात करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता, कोविड पॅनलची माहिती

फ्रेडरिकच्या विरोधानंतरही प्रशिक्षकांच्या सल्ल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर उपचारादरम्यान, फ्रेडरिक आयसीयूतून सातत्याने आपली माहिती देत फोटो शेअर करत होता. तसेच मी लवकरच बरा होईल, असंही सांगत होता.

विशेष म्हणजे फ्रेडरिकने रुग्णालयात दाखल झाल्यानंतर करोना नियमांचं पालन करण्यास विरोध केला होता. याच नियमांमुळे बॉक्सिंगचा सामना रद्द झाल्याचं तो म्हणाला होता.

फ्रेडरिकच्या पत्नीने फेसबूक पोस्ट करत त्याच्या मृत्यूची माहिती दिली. मात्र, तिने त्याचा मृत्यू करोनाच्या नियमांच्या पालनात निष्काळजीपणा केल्यानं झाल्याचं मान्य केलेलं नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Death of famous kick boxing champion frederic sinistra due to corona infection pbs