महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या विचारधारेचे महत्त्व आजही टिकून आहे, किंबहुना सद्य:स्थितीत ती सर्वाधिक लागू होते, असे सांगत भारतातून देहदंडाची शिक्षा हद्दपार केली जावी, असे मत सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांनी व्यक्त केले. गोवा येथे भरलेल्या ‘थिंक फेस्ट’मध्ये त्या बोलत होत्या.
एकीकडे देशात नक्षलवादी आणि राज्यांची पोलीस दले आक्रमकपणे आणि सशस्त्रपणे झुंजताहेत, तर दुसरीकडे श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी रुंदावत चालली आहे. अशा परिस्थितीत समाजात असंतोष वाढीस लागतो. आणि म्हणूनच गांधीजींचे अहिंसेचे तत्त्वज्ञान याच काळात सर्वाधिक लागू पडते, असे त्या म्हणाल्या. आज आपण ग्रहण करतो, अशा वस्तूंपैकी बहुतांशी उत्पादने ही गरिबांकडून तयार केली जातात. पण देशात सर्वाधिक शोषणही त्यांचेच होते, ही परिस्थिती बदलायला नको का, असा सवाल त्यांनी केला. माणसामाणसांमधील तसेच माणूस आणि निसर्गामधील नाते अधिक संवेदनशीलपणे हाताळणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी या वेळी व्यक्त केले.

Story img Loader