देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाच्या डिस्प्ले क्रमांकावर धमकीचा फोन आला होता. एकूण ८ धमकीचे फोन आल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणानंतर रुग्णालयातील लोकांनी याबाबत डीबी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
हेही वाचा- राकेश झुनझुनवालांच्या निधनानंतर रतन टाटांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, “झुनझुनवाला हे…”
धमकी देणारे ८ फोन
मिळालेल्या माहितीनुसार तीन तासांत अंबानी कुटुंबाचा खात्मा करणार असल्याची धमकी देणारे फोन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाच्या डिस्प्ले क्रमांकावर आले होते. जवळजवळ आठ फोन करत एका अज्ञात व्यक्तीने ही धमकी दिली होती. या धमकीनंतर डीबी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांचे एक पथक रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले आहे. या प्रकरणात कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदवण्याचे काम पोलीस करत आहेत. ही धमकी दहशतवाद्यांनी दिली असल्याची शक्यता लायन्स फाउंडेशन संचलित रुग्णालयाचे सीईओ डॉ. तरंग ज्ञानचंदानी यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा- इजिप्त : कैरोमधील अबू सेफीन चर्चला भीषण आग; ४१ जणांचा मृत्यू, तर ५५ जखमी
गेल्यावर्षी अँटिलिया बाहेर आढळली होती स्फोटकांनी भरलेली जीप
गेल्या वर्षी फ्रेब्रुवारी महिन्यात मुकेश अंबानीच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली जीप आढळून आली होती. या स्फोटकांसह घातपाताची धमकी देणारी चिठ्ठीही मिळाली होती. या धमकी प्रकरणात तत्तकालीन पोलीस अधिकारी सचिन वझे यांचा सहभाग असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर दहशतवादविरोधी पथकाने त्यांना अटक केली. ज्या कारमध्ये स्फोटक आढळून आली होती ती कार ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन यांची होती. स्फोटकं आढळल्याच्या घटनेनंतर हिरेन यांचा मृतदेह आढळून आला होता. वाझे यांच्यावर हिरेन यांच्या हत्येचा आरोप करण्यात आला आहे.