भाजपा पक्षाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी अवमानकारक टिप्पणी केल्यानंतर जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सौदी अरेबिया, इराण, पाकिस्तान अशा राष्ट्रांनी शर्मा यांच्या या टिप्पणीनंतर नाराजी व्यक्त केली आहे. तर भारताने आंतराष्ट्रीय पातळीवर आपली बाजू स्पष्ट केली असून नुपूर शर्मा यांची टिप्पणी आणि भारत सरकारचा संबंध नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान, हा वाद पेटल्यानंतर आता नुपूर शर्मा यांना जीवे मारण्याची दिली जात आहे. तसा दावा शर्मा यांनी केला असून दिल्ली पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा >> चराकुंडीवर लावले पंतप्रधान मोदींचे फोटो, प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरणी अरब देशांत तीव्र निषेध
दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने नुपूर शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केल आहे. भारतीय दंड संहितेअंर्गत धमकी देणे, तसेच महिलेचा अवमान या आरोपांखाली हा गुन्हा दाखल करण्यात अला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. याबाबत बोलताना “नुपूर शर्मा यांच्या व्हिडीओवर अज्ञात व्यक्तींनी दिलेल्या प्रतिक्रिया तसेच ट्विट्सचा आम्ही शोध घेत आहोत. तसेच या प्रकरणी आम्ही तपास सुरु केला आहे,” असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा >> प्रेषित मोहम्मद अवमानकारक टिप्पणी प्रकरण : पाकिस्तानने व्यक्त केला निषेध, भारतानेही दिलं प्रत्युत्तर
नुपूर शर्मा यांनी २७ मे रोजी एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये “माझा परिवार तसेच मला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे,” असा दावा नुपूर शर्मा यांनी केला होता. तसेच सत्य पडताळणी करणाऱ्या लोकांनी शर्मा यांचा व्हिडीओ पोस्ट केल्यामुळे शर्मा यांनी त्यांच्यावरदेखईल धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत केला आहे. प्रेषित मोहम्मद यांच्या अवमान प्रकरणाचा वाद वाढल्यानंतर भाजपाने नुपूर शर्मा यांना जबाबदारीतून मुक्त केलं आहे. तसेच त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलंय.