उद्ध्वस्त झालेली घरे.. उघडय़ावर आलेला संसार.. आप्तस्वकियांच्या मृत्यूचा धक्का.. यातून सावरायचे कसे.. याच चिंतेने ग्रासलेले अनेक विमनस्क आणि भकास चेहरे.. नेपाळची राजधानी काठमांडूतील हे चित्र! हिमालयाचे हादरे रविवारीही सुरूच राहिल्याने नागरिकांमध्ये पुन्हा घबराट पसरली होती. नेपाळमध्ये आता मृतांचा आकडा २५०० वर पोहोचला असून, सहा हजार लोक जखमी झाले आहेत. शनिवारच्या प्रलयंकारी भूकंपानंतर रविवारी साडेसहा रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने पुन्हा एकदा काठमांडू परिसर हादरला.
तिसऱ्या जगाचे शाप
आक्रोश आणि घबराट
महाराष्ट्रातील पर्यटक सुखरूप
२२ गिर्यारोहक ठार, २१७ बेपत्ता..
भूकंपग्रस्तांचे युद्धपातळीवर बचावकार्य
पर्यटकांच्या सुटकेसाठी भारताचे प्रयत्न
नेपाळमध्ये भूकंपात ८० टक्के मंदिरांचे नुकसान
उपधक्क्य़ांची ही मालिका रात्री उशिरापर्यंत सुरू होती. भूकंपानंतर आता नेपाळमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. दरम्यान, नेपाळमध्ये राष्ट्रीय आपत्ती जाहीर केली आहे.
नेपाळमध्ये जोरदार पाऊस
भूकंपानंतर आता नेपाळमध्ये पावसाला सुरुवात झाली असून, रविवारी रात्री काठमांडू खोऱ्याला तुफान पावसाने झोडपून काढले. त्यामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण झाले. वीजपुरवठा खंडित झाल्याने काठमांडू आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद ठेवण्यात आला होता. येत्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
२२ गिर्यारोहकांचा मृत्यू
एव्हरेस्टवर गेलेले २२ गिर्यारोहक मृत्युमुखी पडले आहेत. बेस कँपचा मार्ग उद्ध्वस्त झाला असून भारतीय हवाई दलाची विमाने तेथील १०० गिर्यारोहकांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
महाराष्ट्रातील पर्यटक सुखरूप
राज्यातील सुमारे १२०० पर्यटक भूकंपग्रस्त नेपाळमध्ये अडकले असावेत असा अंदाज असून त्यापैकी ८०० जणांशी नियंत्रण कक्षामार्फत संपर्क झाला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
भूकंपग्रस्त नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय पर्यटकांना रविवारी खास विमानाने काठमांडू येथून दिल्लीतील पालम विमानतळावर आणण्यात आले.
देशात ६२ बळी
* उत्तर भारतात शनिवारी बसलेल्या धक्क्यांमुळे भारतातील मृतांची संख्या ६२वर गेली असून, २४० जण जखमी झाले आहेत.
* मृतांमध्ये बिहारमधील ४६, उत्तर प्रदेशमधील १३, पश्चिम बंगालमधील २ आणि राजस्थानमधील एकाचा समावेश आहे. रविवारीही दुपारी १२.४२ वाजता ६.९ रिश्टर क्षमतेचा धक्का जाणवला.
* पश्चिम बंगाल, बिहार, आसाम, झारखंड, ओदिशा, उत्तराखंड, पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, आणि दिल्ली या राज्यांत त्याचा प्रभाव जाणवला.
* रात्री उशिरा आसामलाही साडेपाच रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसला.
मदतीचे हात
* भारताकडून ४३ टन अन्न व मदतसाहित्य
* लष्कराचे २०० जणांचे पथक नेपाळमध्ये दाखल
* भारतीय वायूदलाची एमआय-१७ हेलिकॉप्टर्सच्या मदतफेऱ्या. नेपाळ सरकारकडून ५० कोटींच्या निधीची उभारणी
* अमेरिका, युरोपीय समुदाय यांच्याकडूनही मदत पथके रवाना
* नेपाळमध्ये पुनर्बाधणीसाठी संयुक्त राष्ट्रांकडून सर्वतोपरी साह्य़ाचे आश्वासन
आपद्ग्रस्तांसाठी भारताचे प्रयत्न
भूकंपग्रस्त नेपाळमध्ये अडकून पडलेल्या पर्यटकांना त्वरेने बाहेर काढण्यासाठी विदेशी नागरिकांना सदिच्छा व्हिसा देणे आणि त्यांच्यासाठी बसगाडय़ा व रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, यासारखी पावले भारताने रविवारी उचलली. दरम्यान, पर्यटनासाठी नेपाळला गेलेले २४ नागपूरकर बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा नियंत्रण कक्षाला कळविले आहे.
गुगलतर्फे ‘पर्सन फाइंडर’
नेपाळमध्ये झालेल्या भूकंपामध्ये अडकलेल्यांना शोधण्यासाठी गुगलनेही पुढाकार घेतला असून त्यांनी पर्सन फाइंडर हे टूल कार्यन्वित केले आहे. यामध्ये हरवलेल्या व्यक्तीचे नाव टाकल्यावर त्याचा उपलब्ध तपशील मिळू शकतो. यासाठी गुगलने आप्तकालीन यंत्रणांकडून अधिकृत नावे मिळवली आहेत. रविवारी संध्याकाळपर्यंत या टूलमध्ये १३००हून अधिक नावांच्या नोंदी करण्यात आल्या होत्या. या पर्यायाचा वापर करण्यासाठी https://google.org/personfinder/2015-nepal-earthquake वर भेट द्या.