बांगला देशच्या औद्योगिक इतिहासातील सर्वात मोठय़ा ठरलेल्या इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या ६२० झाली आहे. बारा दिवसांपूर्वी आठ मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील ढिगाऱ्याखाली अडकेले ५३ मृतदेह रविवारी बाहेर काढण्यात आले. दुर्घटनाग्रस्त इमारतीचा ढिगारा उपसण्याचे काम अद्याप सुरू आहे. तसेच संपूर्ण ढिगारा उपसल्यानंतर आणखी मृतदेह हाती लागण्याची भीती आहे.  राजधानी ढाक्यालगत सवर येथे असलेली कपडय़ांचे कारखाने असलेली राणा प्लाझा ही इमारत २४ एप्रिल रोजी कोसळली होती.

Story img Loader