Israel – Hamas War news in Marathi : इस्रायलने आता गाझा शहरातील अल शिफा रुग्णालयाला लक्ष्य केलं असून येथे सातत्याने हल्ले केले जात आहेत. या रुग्णालयाच्या आतील भागात आणि कुंपणाखाली हमासने कमांड पोस्ट दडवली असल्याचा आरोप इस्रायलने केला आहे, मात्र त्याचा काही पुरावा दिलेला नाही. हमास आणि रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी हे आरोप नाकारले आहेत. इस्रायलच्या हल्ल्यामुळे रुग्णालयातील मृत्यूची संख्या सातत्याने वाढत असून या रुग्णालयात आता सर्वच सुविधांची वानवा निर्माण झाली असल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी टेड्रोस अधनॉम घेब्रेयेसूस यांनी केला आहे. त्यांनी एक्सवरून इस्रायलला युद्धविरामाचीही विनंती केली आहे.

हेही वाचा >> गाझामध्ये इस्रायली सैन्याचे जोरदार हल्ले; शिफा रुग्णालयात अडकलेल्या हजारो लोकांचे हाल

Revanth Reddy
Revanth Reddy : तेलंगणा सरकारने नाकारली अदाणी फाउंडेशनची १०० कोटींची देणगी! रेवंत रेड्डींनी सांगितल कारण
EVM Tampering
EVM Tampering : “EVM बद्दल मला कसलीच शंका…
no alt text set
Parliament Winter Session : संसदेच्या हिवाळी अधिवेशनला सुरुवात; भाजपाला ‘या’ मुद्द्यांवर घेरणार विरोधक
PM Narendra Modi addresses the media, criticizing opposition parties for disrupting Parliament.
“सगळ्यात जास्त वेदनादायी बाब ही आहे की…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना केलं लक्ष्य, ‘या’ मुद्द्यावर ठेवलं बोट
Imran Khan
Imran Khan : इम्रान खान यांच्या सुटकेसाठी पाकिस्तानात आंदोलन! राजधानीकडे निघालेल्या समर्थकांना रोखण्यासाठी अश्रुधुराचा
Adani Power's projects in Bangladesh under review, firm will be hired to aid assessment
अदाणी समूहावर आणखी एक संकट, बांगलादेश सरकार करणार अदाणी पॉवरसह अनेक वीज निर्मिती करारांची चौकशी
mob opposing survey of mosque clashes with police
हिंसाचारात तीन ठार; उत्तर प्रदेशात मशिदीच्या सर्वेक्षणाला विरोध, जमावाचा पोलीसांशी संघर्ष
parliament session likely to be stormy over bribery charges on adani
अदानी’आरोपांच्या छायेत आजपासून संसद अधिवेशन; सर्वपक्षीय बैठकीत विरोधक आक्रमक

इस्रायलने आता युद्धविराम केले पाहिजे, असे जागतिक आवाहन केले जात असतानाही इस्रायलने हल्ले चालूच ठेवले आहेत. टेड्रोस अधनॉम घेब्रेयेसूस यांनी X वर केलेल्या पोस्टनुसार, “जागतिक आरोग्य संघटनेने अल शिफा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. येथील परिस्थिती भयंकर आणि धोकादायक आहे. गेल्या तीन दिवसांपासून येथे वीज, पाणी आणि इंटरनेट सुविधा नाही. त्यामुळे मुलभूत सुविधा पुरवणे कठीण झाले आहे. परिसरात सातत्याने गोळीबार होत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे रुग्णालयात मृतांची संख्या वाढली आहे. हे रुग्णालय आता रुग्णालयाप्रमाणे कार्य करत नाहीय.”

“सुरक्षित अपेक्षित असलेल्या रुग्णालयात मृत्यू, विध्वंस होत असताना जग शांत बसू शकत नाही. त्यामुळे तत्काळ युद्धविराम व्हावा”, असं त्यांनी एक्सवर म्हटलं आहे.

ओलिसांना सोडल्याशिवाय युद्धविराम अशक्य

हमासने ७ ऑक्टोबरला केलेल्या हल्ल्यात ओलीस ठेवलेल्या २४० जणांची सुटका केल्याशिवाय युद्धविराम होणार नाही असे पंतप्रदान बिन्यामिन नेतान्याहू यांनी शनिवारी दूरचित्रवाहिनीवरून केलेल्या भाषणात सांगितले. इस्रायल लढाईत आपली ‘संपूर्ण ताकद’ लावली असल्याचे ते म्हणाले.

गाझामधील हमासची १६ वर्षांची सत्ता संपवण्याची, तसेच त्याच्या लष्करी क्षमता चिरडून टाकण्याची प्रतीज्ञा इस्रायलने केली आहे. या युद्धात झालेल्या भीषण जीवहानीसाठी आणि वेढल्या गेलेल्या या भागात लोक अडकून पडल्यासाठी हमासच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

हेही वाचा >>>ऐन दिवाळीत गुजरातमध्ये ७१ कैद्यांची सुटका, कारण सांगत गृहमंत्री म्हणाले, “केंद्र सरकारने…”

युद्धाला सहा आठवडे झाले असताना, जवळचा मित्र असलेल्या अमेरिकेसह इस्रायलवर आंतरराष्ट्रीय दबाव येत आहे. अंदाजे ३ लाख पॅलेस्टाईन समर्थकांनी शनिवारी रस्त्यांवर मोर्चा काढला. युद्ध सुरू झाल्यापासून या शहरात झालेले हे सर्वात मोठे निदर्शन होते.