दक्षिण ब्राझीलमध्ये रविवारी प्रवासी बस दरीत कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात ४२ जण ठार झाले . घटनास्थळी बचावकार्य सुरु असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे प्रवक्ते क्लाडिओ थॉमस यांनी सांगितले.
शासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण ब्राझीलमधील सांता कॅटरिना येथे हा अपघात झाला आहे. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस सुमारे ४०० मीटर खोल दरीत कोसळली. या बसमधून सुमारे ५० प्रवासी प्रवास करत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अधिका-यांच्या माहितीनुसार यापेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत होते.

Story img Loader