हैतीमध्ये शनिवारी ७.२ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या असून मोठ्या प्रमाणात जिवीतनहानी झाली आहे. विनाशकारी भूकंपानंतर रविवारी हजारो जखमी रहिवाशांनी हैतीची रुग्णालये भरली आहेत. या भूंकपामुळे बहुतेक जीवितहानी देशाच्या दक्षिण भागात झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, शनिवारच्या ७.२ तीव्रतेच्या विनाशकारी भूकंपामुळे हैतीमध्ये अनेक शहरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. आतापर्यंत भूकंपामुळे १,२९७ जणांचा मृत्यू झाला आहे तर हजारो जण जखमी झाले आहेत. भूस्खलनामुळे बचाव कार्यात अडथळा निर्माण होत आहे. करोना विषाणूच्या साथीमुळे आधीच त्रस्त असलेल्या हैतीच्या लोकांना भूकंपामुळे आणखी त्रास सहन करावा लागत आहे. पंतप्रधान एरियल हेन्री प्रभावित भागांना भेट देत आहेत. विमान भाड्याने घेऊन लेस केज येथून जखमींना राजधानी पोर्ट-औ-प्रिन्समधील रुग्णालयात नेण्यास सुरुवात केली आहे.

७.२ रिश्टर स्केलच्या भूकंपाने देशाचा चेहरामोहरा बदलला आहे. हैतीमध्ये शेकडो लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत, बचाव पथक त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मोठ्या संख्येने घरे आणि इमारती कोसळल्याने लाखो लोक उघड्यावर आले आहेत. हवामान विभागाने सोमवारी आणि मंगळवारी देशाच्या किनारपट्टी भागात वादळ येण्याची शक्यता वर्तवली आहे. काही भागात वादळपूर्व पाऊस आणि जोरदार वारे वाहू लागले आहेत.

भूकंपाचे केंद्र हे राजधानी पोर्ट-औ-प्रिन्सपासून १२५ किमी पश्चिमेस आहे. भूकंपाच्या काही तासांनंतरही जमिनीचा थरकाप जाणवला. यामुळे इमारतींना भेगा पडल्या आणि काही मोडकळीस आलेल्या इमारती कोसळल्या. भूकंपामुळे सर्वाधिक प्रभावित किनारपट्टीवरील लेस केज शहरातही वीजपुरवठा खंडित झाला आहे. यामुळे बचाव कार्यात अडथळा निर्माण होतो. लोक आता ढिगाऱ्याखाली दबलेल्या स्वतःला आणि त्यांच्या कुटुंबियांना वाचवण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

एक महिना आणीबाणीची घोषणा

पंतप्रधान एरियल हेन्री हे जेथे शहरे उद्ध्वस्त झाली आहेत आणि रूग्णांनी भरलेली रुग्णालये आहेत त्यांना मदत पाठवत आहे. पंतप्रधानांनी देशभरात एक महिनाभर आणीबाणी घोषित केली आहे आणि नुकसानीची संपूर्ण आकडेवारी येई पर्यत ते आंतरराष्ट्रीय मदत घेणार नसल्याचे सांगितले. हैतीमध्ये काही शहरे पूर्णपणे नष्ट झाली आहेत.