स्वयंघोषित संत आसाराम बापू यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी मंगळवारी अपूर्ण राहिल्यामुळे त्यांना आणखी एक रात्र जोधपूरमधील तुरुंगात काढावी लागणार आहे. त्यांच्या जामीन अर्जावर आता बुधवारी सकाळी ११ वाजता सुनावणी होणार आहे.
नातीसोबत आजोबांनी बंद खोलीत वेळ घालवला तर गुन्हा नाही – आसाराम बापू
अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून आसाराम बापू यांना शनिवारी रात्री जोधपूर पोलिसांनी इंदूरमधून अटक केली. न्यायालयाने सुरुवातीला त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आणि सोमवारी त्यांची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर आसाराम बापू यांच्या वकिलांनी त्यांच्या जामीनासाठी न्यायालयात याचिका दाखल केली. जामीन अर्जावरील सुनावणी मंगळवारी पूर्ण झाली नाही. आता बुधवारी याप्रकरणी सुनावणी होईल.

Story img Loader