भारताच्या वतीने हाती घेण्यात येणाऱ्या मंगळ मोहिमेचा दिवस शनिवारी निश्चित करण्यात येणार असल्याचे भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (इस्रो) अध्यक्ष के. राधाकृष्णन यांनी येथे सांगितले.
मंगळ मोहीम प्राधिकारी मंडळाची बैठक शनिवारी होणार असून त्यामध्ये दिवस निश्चित केला जाईल. उपग्रह आणि प्रक्षेपक यांची स्थिती उत्तम आहे. भारतीय नौवहन महामंडळाकडून ‘यमुना’ आणि ‘नालंदा’ या दोन मोठय़ा नौका भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या आहेत.
या नौकांवरील दळणवळण टर्मिनल दक्षिण पॅसिफिक समुद्रात येण्याच्या मार्गावर असून सदर टर्मिनल योग्य ठिकाणी स्थानापन्न व्हावे लागेल आणि त्याचा तपशील शनिवापर्यंत मिळेल, असेही राधाकृष्णन यांनी सांगितले.