सामान्यपणे कुठल्याही बांधकामाच्या ठिकाणी किंवा रस्त्यावर दिसून येणारं गाढव हा नामशेष होणाऱ्या प्राण्यांच्या यादीत आहे असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. देशात गेल्या काही दिवसात गाढवांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ब्रुक इंडियाने (BI) केलेल्या सर्व्हेतून ही माहिती उघड झाली आहे. देशभरातील गाढवांच्या संख्येत एकूण ६१.२३ टक्के इतकी घट झाल्याचे समोर आलं आहे. हा अहवाल संस्थेने सरकारच्या पशुसंवर्धन विभागाला दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“२०१२ आणि २०१९ पशुगणना दरम्यान भारतातील गाढवांच्या संख्येमध्ये एकूण ६१.२३ टक्के घट नोंदवली गेली आहे.तर आंध्र प्रदेश आणि तेलंगानाच्या काही भागांमध्ये गाढवांची हत्या केली जात असल्याचं समोर आलं आहे. २०१२ च्या लाइव्ह स्टॉक्सच्या गणनेनुसार भारत जवळपास ०.३२ दशलक्ष गाढवांची संख्या होती. ती २०१९ च्या पशुधन गणनेनुसार केवळ ०.१२ दशलक्ष इतकी कमी झाली. जवळपास ६१.२३ टक्क्यांची घट दिसून आली आहे.”, असं सर्व्हे करणाऱ्या ब्रुक इंडिया संस्थेचे सदस्य शरत के वर्मा यांनी एका वृत्तपत्राला सांगितले. ” बीआय टीमने महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश आणि गुजरातच्या अंतर्गत भागांना भेट दिल्या. २०१२ आणि २०१९ पशुगणनेत या कालावधीत गाढवांच्या संख्येत घट दिसून आली. घट होण्याबाबत तपशील जाणण्यासाठी आम्ही अनेक गाढव मालक, पशु व्यापारी, पशु मेळ्यांचे आयोजक आणि राज्य आणि केंद्रीय पशुसंवर्धन अधिकाऱ्यांशी बोललो”, असंही शरत के वर्मा यांनी पुढे सांगितलं. स्थानिक गाढव व्यापाऱ्याचं संदर्भ देत वर्मा म्हणाले की, “काही वर्षांपूर्वी चीनमधील एका व्यक्तीने महिन्याला २०० गाढवं खरेदी करण्यासाठी संपर्क साधला होता. गाढवाचे कातडे हवं असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.” जिवंत गाढवं, चामडं आणि मांस याची निर्यात बेकायदेशीर सहज होत असल्याचंही त्यांनी पुढे नमूद केलं.

देशात नवा कामगार कायदा २०२२-२३ आर्थिक वर्षापासून लागू होणार!; ४ दिवस काम आणि पगारात होणार बदल

“भारतातच नव्हे तर जगभरात गाढवांची संख्या कमी होण्यासाठी चीनला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार धरले जात आहे. कारण गाढवाच्या चामड्याचा वापर ‘इजियाओ’ हे पारंपरिक चिनी औषध बनवण्यासाठी केला जातो. “इजियाओ हे आयुष्य आणि सेक्स ड्राइव्ह वाढवते आणि इतर आजार बरे करण्यासाठी उपयुक्त असल्याचं समज आहे.”, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

वर्क फ्रॉम ऑफिसला स्थगिती!, करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे आयटी कंपन्यांचा सावध पवित्रा

गाढवाचे मांस खाल्ल्याने आरोग्याला फायदा होतो असा समज असल्याने देशातील काही भागांमध्ये गाढवाच्या मांसाला मागणी आहे. या कारणामुळेही गाढवांची संख्या कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (एफएसएसएआय) सांगण्यानुसार गाढवाचे मांस हे खाण्यासाठी वापरु शकत नाही. गाढवाचे मांस खाणे कायद्यानुसार चुकीचं आहे. याचसंदर्भात आता आंध्र प्रदेशमध्ये तपास सुरु असल्याचे वृत्त आयएएनएस या वृत्तसंस्थेनं दिलं होतं.