भारतात वाघांची संख्या कमी होण्याला त्यांच्यातील जनुकीय विविधतेचा अभाव हे प्रमुख कारण असल्याचे वैज्ञानिकांचे मत आहे. प्रजोत्पादनासाठी वाघांना जोडीदारात वैविध्य लाभत नसल्याने हे घडून येत आहे, असे एका संशोधनात दिसून आले आहे. जगातील साठ टक्के जंगली वाघांचे भारत हे वस्तीस्थान आहे पण वाघांची संख्या घटत चाली आहे. ब्रिटिश काळात म्हणजे १८५८ ते १९४७ दरम्यान जे वाघ मारले गेले त्यांच्यात जनुकीय विविधता खूप जास्त होती. त्यांच्यातील ९३ टक्के जनुके आताच्या आधुनिक वाघांमध्ये नाहीत. आता केवळ २० ते १२० वाघांमध्ये जनुकीय विविधता आहे असे या संशोधनातील प्रमुख प्राध्यापक माइक ब्रुफोर्ड यांनी म्हटले आहे. सुरूवातीला भारतात ४०००० वाघ होते, पण ब्रिटिशांच्या काळात शिकारीमुळे त्यांची संख्या १८०० पर्यंत खाली आली. अवघ्या शंभर वर्षांत हे घडून आले.
आणखी वाचा