भारतीय नौदलासाठी विविध प्रकारच्या युद्धनौका आणि पाणबु्ड्यांच्या बांधणीचे काम देशातील विविध गोदींमध्ये युद्धपातळीवर सुरु आहे. गेल्या काही वर्षात अत्याधुनिक युद्धनौकांच्या समावेशामुळे नौदलाची ताकदीत मोलाची भर पडली आहे, पडत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फ्रान्स देशाच्या स्कॉर्पिन पाणबुड्यांचे तंत्रज्ञान भारताला हस्तांतरीत करत कलवरी वर्गातील सहा पाणबुड्यांची बांधणी गेली काही वर्षे सुरु होती. त्यापैकी पाच पाणबुड्या या नौदलात दाखल झाल्या असून सहावी आणि शेवटची पाणबुडी Vaghsheer च्या खोल समुद्रातील चाचण्यांना आता सुरुवात झाली आहे.

२०१९ च्या आधी Vaghsheer पाणबुडीच्या बांधणीला मुंबईतील माझगाव गोदीत सुरुवात झाली. करोना काळामुळे या बांधणीला काहीसा उशीर झाला. एप्रिल २०२२ मध्ये या पाणबुडीचे जलावतरण झाले. किनाऱ्यालगतच्या चाचण्या यशस्वी झाल्यावर आता खोल समुद्रातील चाचण्यांसाठी Vaghsheer रवाना झाली आहे. यामध्ये पाणबुडीतील सर्व प्रकारची शस्त्रास्त्रे, रडार यंत्रणा, संपर्क यंत्रणा, आणीबाणीच्या काळातील परिस्थितीचा सामना करण्याची पाणबुडी आणि त्यातील नौसैनिकांची क्षमता अशा विविध चाचण्या केल्या जाणार आहेत. सर्व चाचण्या यशस्वी पार पडल्या तर पुढील वर्षी मार्च २०२४ पर्यंत Vaghsheer नौदलाच्या सेवेत दाखल होईल असा अंदाज आहे.

हेही वाचा… Maharashtra Breaking News Live : जिल्हाध्यक्षांकडून दोन चापट्या मारल्याचा दावा, सुषमा अंधारेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

कलवरी वर्गातील पाणबुड्या या डिझेल-इलेक्ट्रिक तंत्रावर चालणाऱ्या जगातील अत्याधुनिक पाणबुड्या समजल्या जात आहेत. सुमारे १६०० टन वजन आणि समुद्रात सलग ५० दिवस संचार करण्याची क्षमता या वर्गातील पाणबुड्यांमध्ये आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deep sea trials of the sixth and final submarine of the kalvari class vagsheer started asj