अमेरिकेतील इंडियाना प्रांतात भारतीय विद्यार्थी पी वरूण राज पुचावर ( २४ वर्षीय ) एक जिममध्ये चाकूनं हल्ला केला होता. हल्ल्यानंतर पी वरूण यांची प्रकृती खालावली आहे. या घटनेवर अमेरिकेनं खेद व्यक्त केला आहे. पी वरूणच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं प्रार्थना केली आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांनी ‘एएनआय’ला म्हटलं, भारतीय विद्यार्थी पी वरूणवर झालेल्या क्रूर हल्ल्याच्या वृत्तामुळे आम्ही व्यथित झालो आहोत. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. याप्रकरणाची आम्हाला पूर्ण जाणीव आहे.

हेही वाचा : भारतीय तरुणाला चाकूने डोक्यात भोसकलं, अमेरिकेतील धक्कादायक प्रकार; हल्लेखोर म्हणतो, “मला वाटलं तो…!”

नेमकं घडलं काय?

मुळचा तेलंगणातील असलेला पी वरूण राज पुचा हा कॉम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी आहे. रविवारी पी वरूण जिममध्ये गेला होते. तिथे असलेल्या जॉर्डन एंड्रेड नावाच्या व्यक्तीनं पी वरूणवर चाकूनं हल्ला केला. या हल्ल्यात पी वरूण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार चालू आहेत.

आरोपी जॉर्डन एंड्रेडला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एंड्रेडवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. एंड्रेडला पोर्टर येथील न्यायाधीश जेफरी क्लाइमर यांच्यासमोर हजर करण्यात आलं होतं. पण, एंड्रेड त्याच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.

Story img Loader