भारतीय नौदलात ठारविक कालावधीनंतर विविध प्रकारच्या युद्धनौका या निवृत्त होत असतांना, त्यांची जागा नवीन युद्धनौका ( warships ) घेत असते. काळानुसार, बदलत्या तंत्रज्ञानानुसार, बदलत्या युद्धरणनितीनुसार अनेक बदल करत नव्या युद्धनौकांची उभारणी केली जाते. याचाच एक भाग म्हणून देशातील विविध गोदींमध्ये विविध क्षमतेच्या युद्धनौकांची बांधणी युद्धपातळीवर सुरु आहे. मुंबईतील माझागाव गोदीमध्ये ( Mazgaon Docks Limited ) सध्या दोन महत्त्वाच्या युद्धनौकांची बांधणी सुरु आहे. यापैकी विनाशिका ( Destroyer ) आणि फ्रिगेट प्रकारातील प्रत्येकी एक अशा एकुण दोन युद्धनौकांचे जलावतरण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ( Rajnath Singh ) यांच्या उपस्थितीत १७ मे ला होणार आहे.

विनाशिकेचं नाव सूरत ( INS Surat -D69) आहे तर उदगिरी ( Udaygiri ) असं फ्रिगेटचे नाव आहे. अर्थात या युद्धनौका प्रत्यक्ष नौदलाच्या सेवेत दाखल होतील तेव्हा त्यांना ही संबंधित नावे देण्यात येतील. सध्या सूरतला Yard No – 12707 या नावाने ओळखले जाते. तर उदगिरीला Yard No – 12653 या नावाने ओळखले जाते आहे. माझगाव गोदीने आत्तापर्यंत अनेक युद्धनौकांची बांधणी केली आहे. असं असलं तरी दोन युद्धनौकांच्या जलावतरणाचा एकत्रित सोहळा हा पहिल्यांदाच होत आहे. दोन्ही युद्धनौका या काही मिनिटांच्या अंतराने गोदीतून विशिष्ट पद्धतीने पहिल्यांदाच पाण्यात उतरवल्या जातील, युद्धनौका पहिल्यांदाच पाण्याला स्पर्श करतील.

Top 10 richest people in India as of January 2025
Top 10 richest people in India : मुकेश अंबानी ते डी मार्टचे संस्थापक…जानेवारी २०२५ पर्यंत ‘हे’ आहेत देशातील टॉप १० सर्वात श्रीमंत व्यक्ती; वाचा यादी
Kangana Ranaut and Priyanka Gandhi vadra
‘तुम्ही माझा Emergency चित्रपट नक्की पाहा’, कंगना रणौत…
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal House: अरविंद केजरीवाल यांच्या घराची गोष्ट; १९४२ चं बांधकाम आणि ३३.६६ कोटींचा दुरुस्ती खर्च!
killademente
Carol Acosta Dies : रेस्टॉरंटमध्ये जेवताना घशात घास अडकला, प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा कुटुंबियांसमोरच मृत्यू
8 year girl dies due to Attack
Heart Attack : धक्कादायक! आठ वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शिक्षिकेला वही दाखवत असताना कोसळली; कुठे घडली घटना?
Image of a "missing person"
एक चुकीचं स्पेलिंग अन् किडनॅपर अडकला जाळ्यात… पोलिसांनी ‘असा’ उधळला कट
Image of the Supreme Court building
Ladki Bahin Yojana : “सरकारकडे ‘लाडकी बहीण’ सारख्या योजनांसाठी पैसे आहेत पण…”, मोफत पैसे देण्याच्या योजनांवर सर्वोच्च न्यायालयाचा संताप
Man Grabs Leopard By Tail
Video: गावकऱ्याची कमाल, पळणाऱ्या बिबट्याची शेपटी पकडून धरून ठेवलं अन् लोकांचा जीव वाचवला; व्हिडीओ होतोय व्हायरल
Assam Assam Coal Mine Rescue
Assam: दुर्दैवी घटना! आसाममध्ये २०० फूट खोल बेकायदा कोळसा खाणीतून एका कामगाराचा मृतदेह काढला; ९ जण अद्यापही अडकलेलेच

काय आहे ‘सुरत’ ?

नौदलाच्या Project 15B Destroyers या कार्यक्रमाअंतर्गत युद्धनौकांची बांधणी माझगावच्या गोदीत सुरु आहे. या वर्गातील युद्धनौकांना विशाखापट्टणम वर्गातील युद्धनौका ( Visakhapatnam-class destroyers ) म्हणून ओळखले जाते. यापैकी पहिली युद्धनौका विशाखापट्टणम गेल्या वर्षी नौदलात दाखल झाली असून इतर दोन युद्धनौका INS Mormugao आणि INS Imphal यांच्या समुद्रातील चाचण्या सुरु आहे. तर या वर्गातील शेवटची आणि चौथी युद्धनौका ‘सूरत’चे आता जलावरण होत आहे. जलावतरण झाल्यावर सुरतवर विविध उपकरणे, युद्धसामुग्री बसवली जाणार आहे. त्यानंतर सूरतच्या सखोल समुद्रात विविध चाचण्या घेतल्या जातील आणि २०२५ पर्यंत नौदलात दाखल केली जाईल अशी अपेक्षा आहे. त्यावेळी सुमारे सात हजार ४०० टन वजनाची, ब्रह्मोस सारख्या क्षेपणास्त्रांनी सज्ज सूरत युद्धनौका ही जगातील एक अत्याधुनिक आणि एक शक्तिशाली युद्धनौका म्हणून ओळखली जाईल.

काय आहे ‘उदयगिरी’ ?

आंध्र प्रदेशीमधील डोंगररांगेवरुन ‘उदगिरी’ असं नामकरण युद्धनौकेचे करण्यात आलं आहे. ही युद्धनौका नौदलाच्या Project 17A Frigates या प्रकल्पाअंतर्गत बांधली जात आहे. पाणबुडी विरोधी कारवाईची मुख्य जबाबदारी या वर्गातील युद्धनौकांवर असणार आहे. या वर्गात एकूण सात युद्धनौका बांधल्या जात आहे. यापैकी चार माझगाव गोदीत तर तीन कोलकता इथल्या Garden Reach Shipbuilders & Engineers या गोदीत बांधल्या जात आहेत. जलावतरण झाल्यावर उदगिरीवर विविध उपकरणे बसवली जातील आणि त्यानंतर समुद्रात उदगिरीची कार्यक्षमता तपासली जाईल. त्यानंतर २०२४ च्या सुरुवातील नौदलात दाखल होईल अशी अपेक्षा आहे.

Story img Loader