गेल्या काहीवर्षांपासून भारताच्या संरक्षण खात्याच्या आधुनिकीकरणाची गती मंदावली होती आता देशाच्या संरक्षण दलांना आवश्यक असलेल्या साधनसामग्रींमध्ये आधुनिकीकरण जलद गतीवर आणण्यावर मोदी सरकारचा भर असेल असे नवनिर्वाचित संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. ते केंद्रीय संरक्षण मंत्रीपदाचा पदभार स्विकारल्यानंतर बोलत होते.
अरुण जेटली म्हणाले की, “आवश्यक साधनसामग्रींमधील आधुनिकीकरणाची मंदावलेली गती वाढविण्यावर नव्या सरकारचा भर असेल. देशाचे संरक्षण ही सर्वोच्च प्राधान्याची गोष्ट आहे त्यामुळे याकडे तितक्याच महत्वाने लक्ष देण्याचा प्रयत्न राहील.” तसेच संरक्षण मंत्रालयात देशाच्या संरक्षण दलाच्या बाबतीत महत्वाचे आणि आवश्यक असणारे निर्णय तातडीने कसे घेण्यात येतील याकडे लक्ष दिले जाईल असेही जेटली म्हणालेत.

Story img Loader