पीटीआय, नवी दिल्ली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन हे रविवारपासून दोन दिवस भारत दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वॉशिंग्टन दौऱ्यापूर्वी द्विपक्षीय सामरिक सहकार्य आणखी वाढवण्याच्या उपायांबाबत चर्चा करतील.दोन आठवडय़ांनंतर मोदी व अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यातील चर्चेनंतर केल्या जाणार असलेल्या अनेक नव्या संरक्षण सहकार्य प्रकल्पांबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि ऑस्टिन हे चर्चा करतील, असे ऑस्टिन यांच्या दौऱ्याची माहिती असलेल्या लोकांनी सांगितले.

हिंदू- प्रशांत क्षेत्रातील, तसेच प्रत्यक्ष ताबा रेषेवरील चीनची आक्रमक वागणूक आणि दहशतवादाच्या धोक्याचा सामना करण्याचे मार्ग हे विषयही सिंह व ऑस्टिन यांच्यात सोमवारी होणाऱ्या चर्चेत असण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.अमेरिकेचे संरक्षणमंत्री दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर रविवारी सिंगापूरहून भारतात येऊन पोहचतील, असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Defense minister of america lloyd austin on visit to india today amy