पीटीआय, महू
अंतर्गत आणि बाह्य शत्रूंवर बारीक लक्ष ठेवण्याचे लष्करी जवानांना आवाहन करतानाच सुरक्षेच्या आघाडीवर भारत ‘सुदैवी’ नसल्याचे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी केले. ते मध्य प्रदेशात इंदूर जिल्ह्यातील दोन शतकांहून जुन्या महू छावणीत जवानांना संबोधित करीत होते.
सुरक्षा परिस्थितीचा विचार करता भारत फारसा भाग्यशाली नाही कारण आपली उत्तर आणि पश्चिम सीमा सातत्याने आव्हानांचा सामना करीत असल्याचे सिंह म्हणाले.
हेही वाचा : क्रूरतेचा कळस! रेल्वे फलाटावर झोपलेल्या बेघरांवर ओतलं थंड पाणी; चिमुकली मुलं ओल्या कपड्यांत थंडीत कुडकुडली!
सिंह यांनी काली पलटण येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मगावी असलेल्या स्मारकावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी उपस्थित होते.
अंतर्गत असो वा बाह्य, शत्रू नेहमीच सक्रिय असतात. त्यांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवायला हवी, त्यांच्याविरोधात योग्य पावलेही वेळीच उचलायला हवी. – राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री