समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी केलेल्या कारगिल युद्धासंदर्भातील वादग्रस्त वक्तव्याविषयी त्यांना विचारणा केली असता आपण त्या वक्तव्यावर ठाम असल्याचे खान यांनी उर्मटपणे सांगितले. उलट आपण केलेल्या या वक्तव्याचे लोकांनी स्वागतच केले पाहिजे. कारगिल युद्धामधील मुस्लिम सैनिकांचे योगदान का दुर्लक्षिले जाते असा उर्मट सवालसुद्धा त्यांनी प्रसारमाध्यमांना केला आहे. तसेच मुस्लिम सैनिकांनी देशासाठी केलेल्या त्यागाबद्दल मी बोललो तर त्यामध्ये काय चुकले असा सवालसुद्धा आझम खान यांनी केला आहे. गाझियाबादमधील लोकसभा प्रचारादरम्यान आझम खान यांनी १९९९च्या कारगिल युद्धात हिंदू नव्हे तर मुस्लिम सैनिकांनी देशाला विजय मिळवून दिल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत भाजपने त्यांच्याविरूद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रारसुद्धा दाखल केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून आझम खान यांनी केलेल्या वक्तव्याचे तपशील मागवून घेण्यात आले होते. यापूर्वी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि पक्षाचे महासचिव अमित शहा यांच्यावर केलेल्या टीकेमुळे आझम खान यांचे नाव वादाच्या भोव-यात सापडले होते.
कारगिल युद्धासंदर्भातील वादग्रस्त वक्तव्यावर आझम खान ठाम
समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी केलेल्या कारगिल युद्धासंदर्भातील वादग्रस्त वक्तव्याविषयी त्यांना विचारणा केली असता आपण त्या वक्तव्यावर ठाम असल्याचे खान यांनी उर्मटपणे सांगितले.
First published on: 09-04-2014 at 02:14 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Defiant azam khan stands by his kargil war remark asks why contributions by muslim soldiers being ignored