राजीनामा देण्यासाठी चहूबाजूंनी दबाव वाढत असताना, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी आपल्या आधीच्या भूमिकेवर ठाम राहण्याचेच ठरविले आहे. आपण राजीनामा देणार नाही, असे त्यांनी बुधवारी पुन्हा एकदा स्पष्ट केले.
स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल येत नाही, तोपर्यंत श्रीनिवासन यांनी स्वतःहून बाजूला झाले पाहिजे, असे मत आयपीएलचे कमिश्नर राजीव शुक्ला बुधवारी दुपारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले होते. त्यापार्श्वभूमीवर श्रीनिवासन यांनी राजीनामा देण्यास नकार दिला.
ते म्हणाले, राजीव शुक्ला पत्रकारांशी काय बोलले, हे मी ऐकलंय. त्यांनी काहीही नवं सांगितलेले नाही. गेल्या रविवारी पत्रकार परिषदेत मी जे सांगितले होते. तेच त्यांनी आज पुन्हा एकदा सांगितले. गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. ही समिती स्वतंत्रपणेच आपले काम करणार आहे. समितीची नियुक्ती, त्यांचे अधिकार, त्यांच्या शिफारशीची अंमलबजावणी हे सर्व स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे. त्यामध्ये माझा कुठलाही हस्तक्षेपण असणार नाही, हे मी सांगितलेलेच होते. तेच शुक्ला यांनी पुन्हा एकदा सांगितले.
समिती स्वतंत्रपणेच आपले काम करणार आहे. त्यांना कार्यकारी अधिकारही देण्यात आल्यामुळे ते दोषी आढळणाऱयांवर योग्य ती कारवाई करू शकतील, असे श्रीनिवासन यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा